मोहोळ (जि. सोलापूर) : भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना ‘लाल दिव्याची गाडी मिळावी, त्यासाठी आम्ही वकिली करू, आमचे ही भाजपमध्ये ऐकणारे कोणीतरी आहेत’ असे वक्तव्य राष्ट्रवादीचे (NCP) माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी केले होते. त्यांच्या त्या वक्तव्यावरून मोठे राजकीय वादंग माजले आहे. ‘भाजपत मंत्री करण्यासाठी कोण ऐकते?’ याचे उत्तर मिळावे, अशा आशयाचे पत्र ई-मेलद्वारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर (Ramesh Barskar) यांनी पाठवले आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्यात ऐन थंडीत राजकारण तापू लागले आहे. (NCP State Secretary Ramesh Barskar criticizes former MLA Rajan Patil)
मोहोळ तालुक्यातील एका नागरी सत्काराच्या सोहळ्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने, भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी आमदार पाटील यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना उद्देशून वरील विधान केले होते.
राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना याबाबत लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या राष्ट्रवादीत मुक्कामी असणारे माजी आमदार यांना जिल्हा भाजपमय करण्याची एवढी काळजी कशी काय? जेवढी भाजपला नाही. तसेच, आमदार मोहिते पाटील यांना लाल दिव्याच्या गाडीसाठी भाजपत कोण ऐकते, याचे उत्तर मिळावे.
सोलापूरचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे संदेश समाज माध्यमातून फिरत होते. मात्र, त्यांना तुम्ही भाजपत जावा, असेही सांगण्यात आले. याचाच अर्थ राष्ट्रवादीत मुक्कामी असणाऱ्या नेत्यांना भाजपमध्ये जाण्याअगोदर भाजप वाढविण्याचे प्रशिक्षण ‘प्रबोधिनी म्हाळगी’मध्ये कसे काय दिले, हे आम्हाला न समजल्याने आपणास हे पत्र लिहिण्याचा अट्टाहास केला आहे, असे बारसकर यांनी नमूद केले आहे. त्यामुळे ऐन थंडीत मोहोळ तालुक्यातील राजकारण पुन्हा तापले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.