Shashikant Shinde : कोरेगावात जनता, कार्यकर्त्यांची घुसमट; येणारा काळ राष्ट्रवादीचाच....

Shashikant Shinde आम्ही विकासकामांच्या आड न येता गावचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर देत आहोत.
Mahesh Shinde, Shashikant Shinde
Mahesh Shinde, Shashikant Shindesarkarnama

Koregaon News : घटनाबाह्य शिंदे - फडणवीस सरकारचा सर्वच बाबतीतील अपयशी कारभार जनतेला असह्य झाला आहे. कोरेगाव Koregaon मतदारसंघात तर अधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेची घुसमट होत आहे. सर्वजण सत्ताधाऱ्यांच्या अंधाधुंद कारभाराला कंटाळले आहेत. त्यामुळे येणारा काळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच NCP आहे, असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी व्यक्त केला.

विसापूर येथील जलजीवन मिशन योजनेतील तसेच इतर विविध कामांचे भूमीपूजन, उद्घाटन करताना ते बोलत होते. या वेळी राष्टवादी कॉंग्रेसच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष सारंग पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप विधाते, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन बाळासाहेब जाधव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सागर साळुंखे, उपसरपंच विठ्ठल साळुंखे, गणपत मदने उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले,‘‘ खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून विसापूरसह मतदारसंघातील अनेक गावांमध्ये जलजीवन योजनेअंतर्गत कोट्यवधींचा निधी मंजूर होऊन कामे सुरु होत आहेत. आम्ही विकासकामांच्या आड न येता गावचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर देत आहोत. विसापूरच्या आणखी इतर विकासकामांसाठीही निधी मिळवून देणार आहे.’’

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Satara : छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास भाजपने आम्हाला सांगू नये… शशिकांत शिंदे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com