सोपलांच्या कारखान्याची थकीत एफआरपी बजरंग सोनवणे देणार; पण...

येडेश्‍वरी ॲग्रो दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना देणार आर्यनच्या एफआरपीचे २१ कोटी रुपये
Dilip Sopal-Rajendra Raut -Bajrang Sonwane
Dilip Sopal-Rajendra Raut -Bajrang SonwaneSarkarnama

सोलापूर : माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांच्याशी निगडीत असलेल्या आर्यन शुगरवर (खामगाव, ता. बार्शी) सोलापूर (Solapur) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा (District Bank) ताबा होता. या साखर कारखान्याची खरेदी बीड (Beed) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते बजरंग सोनवणे यांच्या येडेश्‍वरी ॲग्रोने केली आहे. आर्यन शुगरकडे थकित असलेली २१ कोटी रुपयांची एफआरपी द्यायची कोणी? यावरून बार्शीत मोठे रणकंदन पेटले होते. बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी हा प्रश्‍न आक्रमकपणे हाती घेतल्याने आज (ता. २७ सप्टेंबर) अखेर एफआरपीची रक्कम येडेश्‍वरी ॲग्रोने देण्याचे मान्य केले आहे. (NCP's Bajrang Sonwane will give the arrears FRP of Dilip Sopal's factory)

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आमदार राजेंद्र राऊत, येडेश्‍वरी ॲग्रोचे चेअरमन बजरंग सोनवणे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, डीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास देसाई यांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीनंतर आमदार राऊत व चेअरमन सोनवणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Dilip Sopal-Rajendra Raut -Bajrang Sonwane
Supreme Court Hearing : शिंदे गट शिवसेनेवर दावा करू शकत नाही : ॲड. अभिषेक मनु संघवींचा युक्तीवाद

चेअरमन बजरंग सोनवणे म्हणाले की, कायदेशीरदृष्ट्या ही एफआरपी देण्यास मी बांधिल नाही. परंतु बीड जिल्ह्यात व परिसरात माझी शेतकरीपुत्र म्हणून ओळख आहे. मी माझ्याकडे आहे, ते सगळं विकेन; पण शेतकऱ्यांची एफआरपी थकविणार नाही. एफआरपी देण्यासाठी सोलापूर डीसीसी मला मदत करणार आहे. त्यासाठी मी डीसीसीकडे २१ कोटींच्या कर्जाची मागणी केली आहे. मदतीतून ही रक्कम दिवाळीपूर्वी दिली जाईल.

Dilip Sopal-Rajendra Raut -Bajrang Sonwane
Supreme Court Hearing : शिंदे गट कोणत्या भूमिकेत निवडणूक आयोगाकडे गेला : सुप्रीम कोर्टाचा सवाल

आमदार राऊत म्हणाले, आर्यन शुगरने २०१४-२०१५ मध्ये गाळप केलेल्या उसाची रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीच्या आठ दिवस आगोदर मिळणार आहे. आर्यन शुगरला गाळपासाठी ऊस घातलेल्या शेतकऱ्यांची यादी शोधण्यासाठी पाच जणांची समिती नेमण्यात आली आहे. त्यामध्ये बार्शीचे तहसीलदार, डीसीसी बँकेचे प्रतिनिधी, येडेश्‍वरी ॲग्रोचे प्रतिनिधी, साखर सहसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी व आर्यन शुगरचा भागधारक शेतकरी यांचा समावेश आहे.

या समितीच्या माध्यमातून एफआरपी थकित असलेल्या शेतकऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ही रक्कम देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com