राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा केला दुग्धाभिषेक

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक करून कर्नाटकच्या घटनेचा निषेध केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला दुग्धाभिषेक करताना प्रा. माणिक विधाते समवेत अभिजीत खोसे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला दुग्धाभिषेक करताना प्रा. माणिक विधाते समवेत अभिजीत खोसे

सरकारनामा

अहमदनगर : कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. या घटनेचे पडसाद दोन दिवसांपासू महाराष्ट्र व कर्नाटकात दिसून येत आहे. अहमदनगरमध्येही या घटनेवर प्रतिक्रिया उमटली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक करून कर्नाटकच्या घटनेचा निषेध केला. NCP's city district president anointed the statue of Shivaji Maharaj

बंगळुरू जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना घटनेमुळे आज अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांत तीव्र संतापाची भावना होती. शहर जिल्हाध्यक्ष प्रा. विधाते यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आज दुपारी मार्केट यार्डमधील अश्वारूढ पुतळ्या जवळ जमले. प्रा. विधाते यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करुन पुष्पहार घातला. उपस्थित कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेस किरकोळ म्हणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बम्मोई यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन त्यांचा राजीनामा घेण्याची व या घटने मागील समाजकंटकांनी कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

<div class="paragraphs"><p>छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला दुग्धाभिषेक करताना प्रा. माणिक विधाते समवेत अभिजीत खोसे</p></div>
'आम्हाला शिवाजी महाराज तुमच्यामुळे समजले';पाहा व्हिडिओ

या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, युवक जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, ओबीसी सेलचे अमित खामकर, अर्बन सेलचे प्रा. अरविंद शिंदे, कामगार सेलचे गजेंद्र भांडवलकर, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, अ‍ॅड. गजेंद्र दांगट, घनश्याम सानप, वकील सेलचे अ‍ॅड. योगेश नेमाणे, तुषार कटारिया, पंकज देशमुख, पंकज खरपुडे, मळू गाडळकर, विशाल बेलपवार, रवी दंडी, लहू कराळे, महेंद्र कवडे, मारुती पवार, दादा पांडूळे आदी सहभागी झाले होते.

<div class="paragraphs"><p>छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला दुग्धाभिषेक करताना प्रा. माणिक विधाते समवेत अभिजीत खोसे</p></div>
शिवाजी महाराज, रामदास स्वामींच्या भेटीचे ते शिल्प हटवा : श्रीमंत कोकाटे

प्रा. माणिक विधाते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांची विटंबना खपवून घेतली जाणार नाही. या विकृत मनोवृत्तीचे बिमोड करण्याची गरज असून, भाजप सरकारने अशा प्रवृत्तीना पाठिशी घालू नये, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com