राष्ट्रवादीचे मनसुबे फोल; खासदार निंबाळकर, आमदार गोरेंचे ठराव ठरले पात्र

निंबाळकर व गोरेंना रोखण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मनसुबे फोल ठरले आहेत
Ranjitsinh Nimbalkar, Jaykumar Gore
Ranjitsinh Nimbalkar, Jaykumar GoreSarkarnama

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या कच्चा मतदार यादीत माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माणचे आमदार जयकुमार गोरे यांचे पाणी पुरवठा मतदारसंघातील ठराव जिल्ह बँकेने अपात्र यादीत टाकले होते. त्यावरून या दोघांनी विभागीय सहनिबंधकांकडे हरकत दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन आज विभागीय सहनिबंधकांनी या दोघांचेही ठराव पात्र ठरविले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना चपराक बसली आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदारयादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये १९६३ मतदारांची कच्ची यादी जिल्हा बॅंकेने तयार करून ती सहनिबंधक कार्यालयास पाठवली होती. ही यादी प्रसिद्ध करून त्यावर आक्षेप व हरकती मागविल्या होत्या. कच्च्या यादीवर ४६ हरकती दाखल झाल्या होत्या. यामध्ये सर्वांचे लक्ष वेधले ते पाणीपुरवठा संस्थेतील खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्या नावाचे ठराव जिल्हा बॅंकेने अपात्र यादीत टाकले होते. त्यावर त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर गेल्या आठवड्यात सुनावणी झाली आहे. यावर विभागीय सहनिबंधक काय निर्णय देणार याची उत्सुकता होती. आज सहनिबंधकांनी हे दोन्ही ठराव पात्र ठरवत मतदारयादीत समाविष्ठ केले आहेत. त्यामुळे खासदार निंबाळकर व आमदार गोरेंना रोखण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मनसुबे फोल ठरले आहेत.

Ranjitsinh Nimbalkar, Jaykumar Gore
रामराजे, बाळासाहेब पाटील भाजपच्या नेत्यांना चुचकारणार...

तसेच सोसायटी गटातून मृत सभासदांच्या नावे ठराव असल्याबद्दल १९, यादीत नाव नसल्याबद्दलचे पाच, राजीनामा दिलेला असल्याबद्दल दोन, ठराव केलेल्या प्रतिनिधींच्या नावासच हरकत असलेले ११, संस्थेची निवडणूक झाल्याबद्दलचा पाच आणि नावात दुरुस्तीसाठी चार आक्षेप दाखल होते. यामध्ये सर्वाधिक २७ आक्षेप सोसायटी मतदारसंघातून झालेले आहेत, तसेच खरेदी- विक्री संघाबाबत एक, नागरी बॅंका व पतसंस्थांबाबत सात, गृहनिर्माणमधून सहा, औद्योगिक, विणकर, मजूर व पाणीपुरवठामधील पाच आक्षेपांचा समावेश आहे. मृत सभासदांची नावे यादीत असल्याबद्दल सर्वाधिक आक्षेप आलेले आहेत, या ठरावांची नावे बदलून देण्याची प्रक्रियाही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवसापर्यंत करता येणार आहे.

.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com