नितीन काका बँकेचे अध्यक्ष झाले..पण, कौतूक करायला तात्या नाहीत...

नितीन काकांना Nitin Patil जिल्हा बँकेचा Dcc Bank अध्यक्ष झाल्याचे तात्यांना पहायचे होते. पण आजारपणामुळे तात्यांचे निधन झाले व त्यांच्या हयातीत काकांना पद मिळू शकले नाही. ही खंत पाटलांच्या घरातील सर्वांनाच होती.
Nitin Patil Family
Nitin Patil Familysarkarnama
Published on
Updated on

सातारा : खासदार शरद पवारांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी नितीन लक्ष्मणराव पाटील यांचे नाव जाहीर केले. आज त्यांची बिनविरोध निवड झाली. मुळात माझ्या हयातीत नितीन काका कुठल्यातरी पदावर जावा किंवा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर जावा, अशी कै. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांची इच्छा होती. आज तात्या आपल्यात नाहीत. पण, शरद पवारांच्या आशिर्वादामुळे नितीन काका जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. या आनंदाच्या क्षणी काकांचे कौतूक करण्यासाठी तात्या नाहीत. त्यांच्या आठवणीने काकांना आज गहिवरून आले. पण, वाई तालुक्यातील तात्यांच्या कार्यकर्त्यांनी आज ही उणीव भरून काढत काकांवर कौतूकाचा वर्षावर करत खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली.

जिल्हा बँकेची स्थापना कै. यशवंतराव चव्हाण यांनी केली. तर कै. किसन वीर आबा, रघुनाथराव पाटील, बाळासाहेब देसाई, विलासराव पाटील उंडाळकर, अभयसिंहराजे भोसले, लक्ष्मणराव पाटील यांनी बँकेची धुरा व्यवस्थित संभाळत बँकेची यशस्वी वाटचाल केली. तसेच बँकेचे नाव देश पातळीवर पोहोचवले. त्यामुळे बँकेला एक नावलौकिक प्राप्त झालेला आहे. सध्या खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेची वाटचाल सुरू आहे.

Nitin Patil Family
कालपर्यंत शिवेंद्रसिंहराजेंची चर्चा, आज अध्यक्षपदी नितीन पाटील बिनविरोध...

या वाटचालीत विलासराव उंडाळकरांच्या नंतर लक्ष्मणराव पाटील यांनी बँकेची धुरा चांगल्या प्रकारे संभाळली. लक्ष्मणराव पाटील उर्फ तात्या हे दोन पंचवार्षिक सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले. तात्यांनी आपल्या राजकिय वाटचालीत प्रत्येक तालुक्यात आपल्या कार्यकर्त्यांचा गट निर्माण केला होता. हे सर्व तालुक्यातील गट संभाळण्याचे काम त्यांचे चिंरजीव नितीन काका करत होते. तसेच त्यांनी दुसरे चिरंजीव मकरंद पाटील यांना आमदार केले, त्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच खासदार शरद पवारांकडून साथ मिळाली. पण, त्यांचे सर्व तालुक्यातील गट संभाळणारे नितीन काकांना कोणत्यातरी पदावर काम करताना पहायचे होते.

Nitin Patil Family
सातारा जिल्ह्यात २०५ नगरसेवक होणार, नवीन शासन निर्णयामुळे इच्छुकांना लॉटरी

त्यामुळे त्यांना वाई सोसायटी मतदारसंघातून जिल्हा बँकेवर संचालक केले. तर तात्या स्वतः खरेदी विक्री संघ मतदारसंघातून बँकेवर संचालक होते. नितीन काकांना जिल्हा बँकेचा अध्यक्ष झाल्याचे तात्यांना पहायचे होते. पण आजारपणामुळे तात्यांचे निधन झाले व त्यांच्या हयातीत काकांना पद मिळू शकले नाही. ही खंत पाटलांच्या घरातील सर्वांनाच होती. पण, जिल्ह्यातील बदलते राजकारण आणि पक्षातील गट तट लक्षात घेऊन काकांनी तात्यांच्या मागे त्यांच्या समर्थकांचा प्रत्येक तालुक्यातील गट संभाळला.

Nitin Patil Family
राष्ट्रवादीची सरशी : मकरंद पाटील, राजेंद्र राजपुरे, शिवरूपराजे खर्डेकर जिल्हा बँकेवर बिनविरोध

आज जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत खासदार शरद पवार यांनी नितीन काकांना संधी दिली. पण नितीन काका बँकेचे अध्यक्ष झाल्याचे पहायला व त्यांचे कौतूक करायला आज तात्या हयात नाहीत. याची खंत आज काकांना लागून राहिली आहे. आज जिल्हा बँकेत अध्यक्षपदाचा पदभार संभाळल्यानंतर नितीन काकांनी प्रतिक्रिया देताना त्यांना तात्यांची आठवण झाली अन्‌ त्यांना गहिवरून आले. पण, वाई तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आज ही तात्यांची उणीव भरून काढत काकांवर कौतूकाचा वर्षावर करत खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली. तात्या आज जरी आपल्यात नसले तरी वाई तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांच्या रूपाने ते नितीन काकांच्या पाठशी उभे असल्याचे दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com