Congress News : ओबीसी समाजाला न्याय द्यायचा असेल तर या समाजाची जातनिहाय जनगणना करून त्यांच्या आकडेवारीनुसार सर्वच क्षेत्रात समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे, अशी मागणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केली. गांधींनी ओबीसींचा आवाज संसदेत उठवल्याबद्दल समाजाच्या वतीने आम्ही त्यांचे अभिनंदन करत आहोत, अशी माहिती कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी दिली.
भानुदास माळी म्हणाले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस Congress कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांच्या सूचनेनुसार माझ्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये पनवेल, पुणे, नाशिक, बीड, चंद्रपूर, कऱ्हाड, सांगली आदी ठिकाणी ओबीसींचे मेळावे आयोजित करून ओबीसींच्या विविध मागण्यांवर तसेच जातनिहाय जनगणनेवर केंद्र तसेच राज्य सरकारचे लक्ष वेधले होते.
परंतु त्याची दखल या सरकारने घेतली नव्हती. भारत जोडो यात्रेदरम्यान पटोले व मी ही बाब राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यास प्रतिसाद देत गांधी यांनी ओबीसींच्या विविध अडचणींवर अभ्यास करून संसदेच्या विशेष अधिवेशनात ओबीसींच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडली.
ओबीसी समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर या समाजाची जातनिहाय जनगणना करून ओबीसी समाजाला त्यांच्या आकडेवारीनुसार सर्वच क्षेत्रामध्ये समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी संसदेत केली. त्यांनी ओबीसींवरील अन्यायाला वाचा फोडली आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाकडून राहुल गांधी यांचे आम्ही अभिनंदन करत आहोत. येणाऱ्या काळात काँग्रेस हा एकमेव पक्ष ओबीसींच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहू शकतो असा विश्वास ओबीसी प्रवर्गामध्ये निर्माण झाला आहे.
Edited By Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.