Satara Political News : आमदार अपात्रता प्रकरणात जाणूनबुजून चालढकल : शशिकांत शिंदेंचा आरोप

Satara Collector सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका आंदोलनाला भेट दिल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. या वेळी आमदार अपात्रता प्रकरणावर त्यांनी भाष्य केले.
Eknath Shinde, Rahul Narwekar, Shashikant Shinde
Eknath Shinde, Rahul Narwekar, Shashikant Shindesarkarnama
Published on
Updated on

Shashikant Shinde News : आमदार अपात्रता प्रकरणात सरकार व अध्यक्ष सुनावणीला विलंब लावून जाणीवपूर्वक चालढकल करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्याने घेत विधानसभा अध्यक्षांना गर्भित सूचना केली असेल, तर हे आमदार अपात्र होणार हे लक्षात आल्यानेच ते चालढकल करत आहेत. त्यामुळे अध्यक्षांनी तातडीने निर्णय दिला नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर Satara Collector एका आंदोलनाला भेट दिल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. या वेळी आमदार अपात्रता प्रकरणावर त्यांनी भाष्य केले. शशिकांत शिंदे म्हणाले, आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या मुदतीत अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

पण, न्यायालयाची सूचना गांभीर्याने घेतली जात नसेल, तर सत्तेतील सरकार आणि अध्यक्ष सुनावणीला विलंब लावून चालढकल करत आहेत. ही बाब न्यायालयाने गांभीर्याने घेतल्यानंतर त्यांनी अध्यक्षांना गर्भित सूचना केली असेल. पूर्णपणाने हे आमदार अपात्र होणार हे कायद्याने निश्चित झाल्यानेच ते चालढकल करत होते हे सिद्ध झाले आहे.

न्यायालयाच्या इशाऱ्यानंतरही त्यांनी निर्णय दिला नाही, तर न्यायालयानेच निर्णय घेतला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणात जाणूनबुजून चालढकल चालली असून, अध्यक्षांचा अधिकार असूनही ज्या पद्धतीने प्रक्रिया चालू आहे. प्रत्येक आमदाराला स्वतंत्रपणाने बोलवायचे म्हणजे यातून दोन, तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे.

ही कारवाई वेळेत व्हायला हवी. पण, आमदार अपात्र ठरणार म्हणून जाणीवपूर्वक ही सुनावणी लांबवली जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत ही सुनावणी लांबवली जाण्याची शक्यता आहे, असे त्यांनी नमूद केले. लोकसभा निवडणुकीसंदर्भात आमदार शिंदे म्हणाले, मार्च, एप्रिलपर्यंत लोकसभा निवडणूक आहे. पण डिसेंबर, जानेवारीपर्यंत मुदतीच्या आत ही निवडणूक घेतली जाईल.

Edited By Umesh Bambare

Eknath Shinde, Rahul Narwekar, Shashikant Shinde
Satara : शंभूराज देसाईंच्या आई म्हणाल्या, त्याला मी Collector करणार होते, पण....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com