रामराजे भाजपमध्ये येणार का, या प्रश्नावर जयकुमार गोरेंनी त्यांची `कुंडलीच` मांडली...

आमदार जयकुमार गोरे MLA Jaykumar Gore म्हणाले, आताच काय विचार करण्याची गरज नाही. वाट्याला आल्यानंतर विचार करू Let's think after getting the share.
Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Goresarkarnama
Published on
Updated on

सातारा : काही लोक अशी असतात, मासा जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही, तसं काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. त्यामुळे सत्ता गेल्यामुळे काही लोक प्रयत्न करतात. आम्ही जिल्हा परिषद जिंकू शकतो, जिल्हा बँक जिंकू शकतो, असे सांगणाऱ्यांनी आता सत्ता नसताना ही सत्तास्थाने जिंकून दाखवावीत, मग आम्ही त्यांना सर्टिफिकेट देऊ, असे आव्हान भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे यांनी माजी सभापती रामराजेंचा नामोल्लेख टाळून दिले.

विधान परिषदेचे माजी सभापती व राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवादासाठी बैठकांचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने सभापती पद पुन्हा मिळविण्यासाठी त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांना विचारले असता त्यांनी आपल्या वेगळ्या शैलीत उत्तरे दिली.

Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
रामराजे नाईक निंबाळकरांची हॅटट्रीक ; फलटणमध्ये जल्लोष

रामराजे भाजपच्या वाटेवर असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे, या विषयी विचारले असता आमदार गोरे म्हणाले, याविषयी मला काहीही कल्पना नाही. सत्ता गेल्यानंतर अनेक लोक दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रयत्न करतात. काही लोक अशी असतात, मासा जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही, तसं काही लोक सत्ते शिवाय राहू शकत नाहीत.

Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
सासरे विधानपरिषदेचे सभापती अन् आता जावई होणार विधानसभेचे अध्यक्ष

तुमचा त्यांच्याशी आजपर्यंतचा संघर्ष लक्षात घेता तेच वाट्याला येतंय असे वाटत नाही का, या प्रश्नावर आमदार गोरे म्हणाले, आताच काय विचार करण्याची गरज नाही. वाट्याला आल्यानंतर विचार करू. पक्षाचा निर्णय घेण्याइतका मी मोठा नाही. पण, पक्षाच्या निर्णयासोबत मी असणार आहे.

Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Video: रामराजेंनी राष्ट्रवादीला मान खाली घालायला लावली; जयकुमार गोरेंची टिका

वर्षानूवर्षे सत्तेशिवाय काही लोक काम करत आहेत. पण, काही लोकांना सत्तेशिवाय काम करण्याची सवयी लागली पाहिजे. ही जी सत्तेची सुज आलेली आहे, आम्ही जिल्हा परिषद जिंकू शकतो, जिल्हा बँक जिंकू शकतो. एकदा सत्ता नसताना ही सत्तास्थाने जिंकून दाखवा, मग आपण त्यांना सर्टिफिकेट देऊ, असे आव्हान त्यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com