

Karad, 22 June : धैर्यशील कदम यांना किती मते पडायला पाहिजे होती, कोणी मते दिली नाहीत, काय घडले, याचा नक्कीच आम्ही हिशेब करु. हिशेब करण्यात आम्ही पक्के आहोत. या निवडणुकीसंदर्भात अनेकांची गणिते वेगवेगळी होते. अनेकांच्या मनात एक, ओठात एक आणि करणीत वेगळे होते. मात्र, ते कोणाला शक्य झाले नाही. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी काय केले ते देवाला माहिती, मात्र महायुती म्हणून आम्ही एकत्र येतो, असा टोला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज (ता. २२ जून) कऱ्हाड येथे लगावला.
सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत धैर्यशील कदम विजयी झाले. त्यानंतर आमदार कदम यांनी मंत्री गोरे, आमदार मनोज घोरपडे यांच्यासमवेत कऱ्हाडच्या ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन केले. त्यानंतर मंत्री गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. माजी आमदार आनंदराव पाटील, भाजपचे नेते रामकृष्ण वेताळ, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदार, धनंजय ताटे, एकनाथ बागडी आदी उपस्थित होते.
मंत्री गोरे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांचा सातारा जिल्हा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो, याचा मला मोठा आनंद आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोण सोबत येतील, त्यांना घेऊन, जे येणार नाहीत त्यांना सोडून निवडणूक जिंकायची भूमिका घेण्याची सूचना केली होती.
फडणवीस यांनी या निवडणुकीत बारकाईने लक्ष दिले. त्यामुळे धैर्यशील कदम विजयी झाले. त्यांच्या रुपाने सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीत भाजपचा पहिल्यांदाच उमेदवार निवडून आला आहे. महायुतीतील सर्वच नेत्यांनी सामुदायिक प्रयत्न त्यासाठी केले आहेत.
विधान परिषदेसाठी १०० मते फुटली, ती कोणाची यावर ते म्हणाले, मते किती पडायला पाहिजे होती, कोणी मते दिली नाहीत, काय घडले, याचा नक्कीच आम्ही हिशेब करु. हिशेब करण्यात आम्ही पक्के आहोत. महायुतीचे उमेदवार म्हणून धैर्यशील कदम विजयी झाले आहेत. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी आम्हाला अपेक्षीत विजय मिळाला आहे. आणखी ५० मतांची आवश्यकता होते.
वेगवेगळी गणिते या निवडणुकीसंदर्भात होती. अनेकांच्या मनात एक, ओठात एक आणि करणीत वेगळे होते. मात्र ते कोणाला शक्य झाले नाही. पालकमंत्री देसाई आणि मंत्री पाटील यांनी काय केले ते देवाला माहिती. मात्र, महायुती म्हणुन आम्ही एकत्र येतो. मात्र लोकशाही आहे, त्यामुळे मिळालेला विजय हा मोठा विजय असे मी मानतो.
यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवतो याचा मला आनंद आहे. कऱ्हाडमध्ये दक्षिण-उत्तरसह संपुर्ण परिवर्तन केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सर्वांनी विश्वास ठेवला आहे. त्यामुळे महायुतीच्या सरकारमध्ये अनेकजण येत असून इनकमिंग वेगाने होताना दिसत आहे.
भाजपने निवडणुकीत घोडाबाजार केला आहे असा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी केला त्यावर मंत्री गोरे म्हणाले, आमच्यापेक्षा मी ७०-८० खर्च करतो, मी बघतो, करतो असे ते सांगत होते. त्याची चौकशी केली तर कोणी काय केले ते त्यांच्या लक्षात येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.