विरोधी उमेदवार दालमियांचे दलाल... मदन भोसलेंची टीका

जेव्हापासून ‘जरंडेश्वर’ Jarandeshwar आणि ‘शरयू’ Sharyu त्यांच्या ताब्यात गेले, तेव्हापासून ‘किसन वीर’चा Kisan veer ऊस Sugarcane पळवण्याचेच काम केले.
Madan Bhosale
Madan Bhosalesarkarnama
Published on
Updated on

भईंज : ‘किसन वीर’च्या कार्यक्षेत्रातील साडेचार हजार मेट्रिक टन ऊस अन्य कारखान्यांना जातो. त्यात विरोधी उमेदवार दालमियांचे दलाल म्हणून काम करतात. तेथे जादा दर घेतात. इथे शेतकऱ्याला काटछाट करून देतात. जेव्हापासून ‘जरंडेश्वर’ आणि ‘शरयू’ त्यांच्या ताब्यात गेले, तेव्हापासून ‘किसन वीर’चा ऊस पळवण्याचेच काम केले. ‘किसन वीर’पुढे संकटे उभी करणे, हेच विरोधकांचे काम आहे, अशी टीका किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी केली आहे.

जोशीविहीर (ता. वाई)येथे कारखाना निवडणुकीसंदर्भात कार्यक्षेत्रातील सभासदांचा मेळावा झाला. यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे, कारखान्याचे संचालक चंद्रकांत काळे, प्रवीण जगताप, भय्यासाहेब जाधवराव, सयाजीराव पिसाळ, जयवंत पवार आदी उपस्थित होते.

Madan Bhosale
'किसन वीर' अडचणीत आणण्यात पाटील बंधूंचाच सहभाग...मदन भोसले

मदन भोसले म्हणाले, ‘‘किसन वीर कारखान्याचे हे उभे राहिलेले वैभव एका वर्षात उभे राहिलेले नाही. गेल्या १७ वर्षांत रात्रं-दिवस कष्ट करून उभे केले आहे. ते सभासदांच्या मालकीचे आहे. हा कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवायचा, सहकारात ठेवायचा, हा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. एक निर्णय चुकला तर एका दगडात तीन सहकारी साखर कारखाने पदरात पडतात, याचा गांभीर्याने विचार करावा लागेल.

Madan Bhosale
किसन वीर कारखाना : मदन भोसलेंना राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटलांचे कडवे आव्हान!

मी ‘किसन वीर’साठी बँकेत पैसे मागायला जिथं-जिथं जात होतो, तेथे-तेथे माझी अडवणूक केली. एखाद्या बँकेने पैसे द्यायचे मान्य केले. मात्र, काही दिवसांनी अचानक ते अमान्य केले. तेथेही यांनी पोचून अडचण निर्माण केली. ही विरोधकांनी ठरवून केलेली आर्थिक कोंडी आहे. जाणकार शेतकरी योग्य निर्णय घेतील. नाही तर ना कारखाना तुमच्या मालकीचा राहील, ना तुमच्या अधिकारात राहील, हा खासगीकरणाच्या वाटेने जाईल.’’

Madan Bhosale
चुकीच्या व्यवस्थापनामुळे 'किसन वीर' कारखाना अडचणीत...मकरंद पाटील

यावेळी आमदार महेश शिंदे म्हणाले, ‘‘किसन वीर कारखान्याबाबत पाटील बंधूंनी षडयंत्र सुरू केले आहे. मी स्वतः लक्ष घालून येत्या दोन-तीन वर्षांत कारखान्याची गाडी रुळावर आणून शेतकऱ्यांच्या मालकीच्या कारखान्यावर गतवैभव मिळवून देईन.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com