Radhakrishna Vikhe Patil : विरोधकांची धडपड अस्तित्व टिकविण्यासाठीच; विखे पाटलांचा पवारांना टोला

MVA vs BJP : "महाविकास आघाडीची वज्रमूठ ऐकमेकांवर उगारणार'
Radhakrishna Vikhe Patil, Sharad Pawar
Radhakrishna Vikhe Patil, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Vikhe Patil on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशात भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधातील पक्षांच्या प्रमुखांना भेटणार आहे. भाजपविरोधात देशात तिसरी आघाडी उभी करण्यास मदत करणार असल्याचे सांगितले. राज्यात सत्तेचा वापर सर्वसमावेशक व लहान घटकांसाठी होताना दिसत नाही. आज पैसा, जातीचा वापर सत्तेच्या राजकारणासाठी केला जात असल्याचा आरोपही पवार यांनी केला. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पवार यांचे नाव न टोला लगावला आहे. ते शिर्डी (अहमदनगर) येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Radhakrishna Vikhe Patil, Sharad Pawar
Ajit Pawar News : सध्याचे सरकार भ्रष्टाचाराने बरबटलंय; बदल्यांसाठीही त्यांचे रेट ठरलेत... अजित पवारांची जहरी टीका

देशात भाजपला रोखण्यासाठी तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी बिहराचे मुख्यमंत्री मुंबई दौऱ्यावर आहेत. तसेच शरद पवारही आघाडी उभी करण्यास पुढाकार घेणार आहेत. यावर विचारले असता विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले, "देशात पहिली, दुसरी आघाडी उभी करण्याचे सर्व प्रयत्न यापूर्वीच झालेले आहेत. विरोधकांतील ज्येष्ठ नेत्यांची सुरू असलेली सर्व धडपड ही स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी चालली आहे. त्यातून नवे बळ उभे करण्याचा हेतू किती खरा आहे, यावर प्रश्नचिन्ह आहे. यापूर्वीही अनेक आघाड्या झाल्या, त्यांचे अस्तित्व टिकले नाही. आताही राज्यात महाविकास आघाडीच्या वज्रमुठीची काय आवस्था आहे, हे नागरिक पाहत आहेत. ज्यांना राज्याची वज्रमूठ बांधता आली नाही ते काय देशाला तिसरा पर्याय देणार?"

Radhakrishna Vikhe Patil, Sharad Pawar
Supreme Court : सत्ताधारी अन् विरोधकांचीही धाकधूक वाढली; सत्तासंघर्षांचा निकाल तीन-चार दिवसात येणार?

दरम्यान, पवार (Sharad Pawar) यांनी राज्यात सत्तेचा वापर सर्वसमावेशक व लहान घटकांसाठी होताना दिसत नाही. पैसा, जातीचा वापर सत्तेच्या राजकारणासाठी केला जात आहे. हे राजकारण सामान्य माणसाच्या हातात आणण्यासाठी महाविकास आघाडीला पाठबळ देण्याचे आवाहन केले.

यावर विखे पाटील म्हणाले, "त्यांनी मनात काय ठेवले आहे माहिती नाही. ज्येष्ठ नेत्यांनी राज्यात काय चित्र बदल्यण्याचे स्वप्न दाखविले माहिती नाहीत. मात्र महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. आता जनता तुमच्या थापांना बळी पडणार नाही. लोकांना रोजगार हवा आहे. शेतीला पाणी पाहिजे. हे सरकार शेतकऱ्यांसाठी विविध काम करत आहे. प्रादेशिक वाद सुरू करून त्यांनी राज्यात राजकारण केले. कुटुंबाकुटुंबात लढया कुणी सुरू केल्या? राज्यातील सरकार चळवळ कुणी संपुष्टात आणली? हे सर्व लोकांना समजते."

Radhakrishna Vikhe Patil, Sharad Pawar
Sharad Pawar on MLA Disqualification: शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार? शरद पवारांनी दिले उत्तर

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवार राजकीय वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरल्याची टीका केली आहे. त्यावर पवार यांनी राऊतांची भूमिका महाविकास आघाडीस पोषक असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. याबाबत विखे पाटील म्हणाले, राज्यात विरोधांनी एकत्र येत वज्रमूठ आवळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची वज्रमूठ ऐकमेकांवर उगारल्याशिवाय राहणार नाही. आता त्याला तडे गेलेले आहेत."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com