Video Eknath Shinde: 'लाडकी बहीण'नंतर मुख्यमंत्र्यांची विद्यार्थ्यांसाठी मोठी योजना; विठुरायांच्या साक्षीने...

Ashadhi Ekadashi 2024 CM Eknath Shinde Stipend For Students : बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 6 हजार , डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना 10 हजार. पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी 12 हजार रुपये विद्या वेतन देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur News: आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना गुड न्यूज दिली आहे. 'लाडकी बहीण' योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास विद्यावेतन योजनेची घोषणा आज पंढरपूर येथे केली.

बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 6 हजार , डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना 10 हजार आणि पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी 12 हजार रुपये विद्यावेतन देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विठुरायांच्या साक्षीने जाहीर केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपत्नी विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा केली. त्यानंतर मंदिरातील सभामंडपात झालेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी टोकन दर्शन व्यवस्थेसाठी 103 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. राज्यात भरपूर पाऊस पाणी पडू दे, शेतकरी सुख समृद्धी होऊ दे,अशी प्रार्थना शिंदेंनी विठ्ठलाच्या चरणी केली.

लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांवर या योजनेवरुन टीका करण्यात आली. लाडक्या भावासाठी काय केलं, असा खोचक सवाल विरोधकांनी केला होता. या टीकनंतर 'लाडक्या भावा'साठी मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde : पंढरपुरातून मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; विठुरायाच्या दर्शनाची 'वेटिंग' संपणार

"काहींनी आमच्यावर टीका केली की, लाडक्या बहिणीसाठी योजना आणली, पण लाडक्या भावांचं काय? लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे. जे तरुण बारावी पास झाले आहेत, त्यांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमाधारक तरुणांना आठ हजार, तर पदवीधर तरुणांना महिन्याला १० हजार रुपये दिले जातील," असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

Eknath Shinde
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न, देशातील प्रत्येक घटक सुखी होऊ दे; विठुरायाकडे साकडं

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com