

Parth Pawar News : कोरेगाव पार्क येथील शासकीय जमीन व्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या अमेडिया कंपनीने खरेदीखत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष मंगळवारपर्यंत त्यादृष्टीने कोणतीही कार्यवाही झालेली नाही. संबंधित प्रकरणात एकूण 42 कोटींची स्टॅम्प ड्यूटी भरावी लागणार असून, निश्चित वेळेत ही रक्कम न भरल्यास कंपनीवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे.
कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील शासकीय जमीन अपहार प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह अमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील आणि कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिवाय या प्रकरणात खरेदी करताना मुद्रांक शुल्काची नियमबाह्य पद्धतीने सवलत घेण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर कंपनीने हा व्यवहार रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या शुक्रवारी कंपनीकडून दुय्यम निबंधक कार्यालयास भेट देऊन खरेदीखत रद्द करण्याबाबत चौकशी केली होती. त्यावर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने या कंपनीला नोटीस बजावून खरेदीखतापोटी ७ टक्के म्हणजे २१ कोटी रुपये, तर कॅन्सल डीड करण्यासाठी ७ टक्के म्हणजे २१ कोटी रुपये असे एकूण ४२ कोटी रुपये भरावे भरावेत, असे कंपनीला कळविले आहेत.
मुंढवा येथील शासकीय जमिनी अपहार प्रकरणात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अमेडिया एंटरप्राईझेस या कंपनीला नोटिशीद्वारे पंधरा दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत कंपनीला निर्णय घ्यावा लागणार आहे. मुदत उलटून गेल्यानंतर त्यांच्यावर जप्तीची देखील कारवाई होऊ शकते. तसेच जेवढे मुद्रांक शुल्क बुडविले आहे, तेवढ्या रकमेवर दरमहा एक टक्का व्याज लागते.
- श्रीकांत जोशी, मार्गदर्शक, अवधूत लॉ फाउंडेशन
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.