Ashutosh Kale: विकास कामाचा अहवाल घरोघरी पोहोचवाः चैताली काळे

Ashutosh Kale: शेतकऱ्यांना विमा रक्कम लवकर मिळावी यासाठी प्रयत्न
Kopargaon Assembly
Kopargaon AssemblySarkarnama
Published on
Updated on

Ashutosh Kale: महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार आशुतोष काळे यांनी पाच वर्षे कार्यकाळात मतदारसंघात मोठी विकास कामे केली आहेत. या कामाचा लेखाजोखा पुस्तिकेतून प्रसिद्ध झालेला आहे.

कार्यकर्त्यांनी विकास कामांचा अहवाल मतदारांच्या घरापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन जिल्हा बँक माजी संचालिका चैताली काळे यांनी केले आहे.

Kopargaon Assembly
Ashutosh Kale: आमदार काळेंना मताधिक्य द्या: लोहाटे

महायुतीचे उमेदवार काळे यांच्या प्रचार फेरीनंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्या पुढे म्हणाल्या, शेतकऱ्यांना विमा रक्कम लवकर मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याचप्रमाणे वाड्या-वस्त्यांवर जाण्यासाठी चांगले रस्ते करण्यासाठी शासनाकडून निधी मिळविला.

मतदारसंघातील नागरिकांच्या सुख-दुःखाप्रसंगी मदतीचा हात देण्याचे काम आमदार काळे यांनी केलेले आहे. काळे घराण्याचे हे संस्कार आहेत. महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता यावा यासाठी मतदारसंघात कॅम्प लावून फॉर्म भरून घेण्यात आलेले होते.

या सर्व कामाचा विचार करून महिला, पुरुषांनी काळे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या. गावातून जास्तीत जास्त मतदान घडून आणून काळे यांना भरघोस मते देण्याचा उच्चांक घडवावा, असे त्या म्हणाल्या.

यावेळी धनंजय जाधव, विजय धनवटे, उपसरपंच ॲड. निकिता जाधव, वैजयंती धनवटे, चंद्रकांत वाटेकर, संजय धनवटे आदींची भाषणे झाली. पदयात्रेत श्याम धनवटे, अशोक बोरवणे, बबलू पऱ्हे, रामकिसन चव्हाण, सुनील थोरात, शांतीलाल भाटी आणि मान्यवरांनी सहभाग घेतला होता. महिलांची संख्या ही लक्षणे होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com