Atul Bhosale: कऱ्हाडमध्ये उद्योग आणता आला नाही

Atul Bhosale: जयवंत पाटील यांचा आरोप; अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ सभा
Karhad South Assembly
Karhad South AssemblySarkarnama
Published on
Updated on

Atul Bhosale: कऱ्हाड दक्षिणचे आमदार आणि त्यांचे कुटुंब ६० वर्षे मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. तितक्या वर्षांत त्यांना कोणताही उद्योग आणता आला नाही, ना त्यांना एवढ्या वर्षांत कोणतेही तरुण नेतृत्व उभे करता आले.

दहा वर्षांत आमदारांना जमले नाही. मात्र, अतुल भोसले यांनी कऱ्हाडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी भरघोस निधी आणून दाखवला, असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी केले.

महायुतीचे कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ उपाध्यक्ष पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचार सभा घेतली. त्यावेळी श्री. पाटील बोलत होते.

माजी नगरसेवक अतुल शिंदे, सुहास जगताप, दिलीपराव पाटील, रोहित पवार, किशोर शिंदे, शिवराज इंगवले, बाबूराव पवार, दिलीप घोडके, महादेव पवार, कलबुर्गी, विजय काटरे, महेश कांबळे, हणमंतराव निर्मळे, पैलवान आनंदराव मोहिते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, ‘‘कऱ्हाडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची अवस्था अत्यंत बिकट होती; पण अतुल भोसलेंनी महायुती सरकारच्या माध्यमातून स्टेडियमच्या विकासासाठी ९६.५० कोटींचा निधी मंजूर करून आणत विकासाचे मोठे काम केले.

यामुळे कऱ्हाडच्या वैभवात भर पडणार आहे. त्यांचे नेतृत्व तडफदार, संयमी, सुसंस्कृत आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहे. त्यामुळे येत्या विधानसभेला अतुल भोसलेंचा विजय निश्चित आहे.’’

Karhad South Assembly
Atul Bhosale: समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध

श्री. भोसले म्हणाले, ‘‘महायुती सरकारच्या माध्यमातून ७४५ कोटींचा निधी कऱ्हाड दक्षिणच्या विकासासाठी आणता आला, याचा मला अभिमान आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्यास मी सदैव कटिबद्ध आहे. भविष्यातही समाजाची सेवा करण्यासाठी संधी जनतेने द्यावी.’’

राजेश पाटील-वाठारकर म्हणाले, ‘‘अप्पासाहेबांच्या विकासकार्याचा वारसा डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी जोपासला आहे.

विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी तळागाळातील लोकांना नोकरीची संधी मिळवून दिली आहे. आरोग्यसेवेचे मोठे कार्य ते अविरतपणे करत आहेत. त्यामुळे त्यांना संधी देण्याची गरज आहे.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com