Sangram Jagtap: अहिल्यानगर शहर मेट्रोसिटी करू

Sangram Jagtap: पुढील १५ ते २० वर्षांचा विचार करून शहरातील सर्व डीपी रस्त्यांची दर्जेदार कामे सुरू
Nagar Assembly
Nagar AssemblySarkarnama
Published on
Updated on

Sangram Jagtap: सरकार दरबारी माझे वजन आहे. त्याचा उपयोग मोठा विकासनिधी मंजूर करून आणला. यापुढे सेवावृत्तीने मातृभूमीसाठीच पूर्णवेळ काम करण्याची माझी भूमिका आहे. राज्याच्या नकाशावर विकसित नगर शहर म्हणून वेगळी ओळख निर्माण करणार आहे.

शहर हे मेट्रोसिटी करायचे आहे. यासाठी सर्वांची साथ मला हवी आहे. अहिल्यानगरमधील ५३ व्यापारी संघटनांनी माल पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्वांच्या ऋणात राहील, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केले.

मंगळवारी सायंकाळी व्यापाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जगताप बोलत होते. यावेळी सर्व संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nagar Assembly
Sangram Jagtap : आमदार जगताप म्हणाले, 'अजितदादा आहेत, म्हणून आम्ही राहिलो'!

व्यासपीठावर माजी आमदार अरुण जगताप, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, संतोष बोथरा, डाळ मंडई आडतेबाजार मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गांधी, सराफ संघटनेचे अध्यक्ष सुभाष कायगावकर, इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष अरविंद गुंदेचा, जॉग्री असोसिएशनचे अध्यक्ष राजू बोथरा, मिरची मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ मणियार, आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय चोपडा, क्रीडाईचे अध्यक्ष अमित मुथा, भाजी फळ फूल व्यापारी असोसिएशनचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक लाटे, उद्योजक व रामकृष्ण क्रेडिट सोसायटीचे चेअरमन श्रीगोपाल धूत, तसेच अनेक विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

जगताप म्हणाले, की शहर बदलत असल्यानेच शहरीकरणाला व्यापारी, उद्योग क्षेत्राल चालना देण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून शहर विकासाचे नियोजन करत आहे.

औद्योगिक क्षेत्र वाढून रोजगार वाढवा, यासाठी विळदमध्ये ६०० एकर क्षेत्रात नव्या एमआयडीसीसाठी जागा मंजूर झाली आहे. हे अहिल्यानगर विकासाचे महत्त्वाचे पाउल आपण टाकत आहोत.

पुढील १५ ते २० वर्षांचा विचार करून शहरातील सर्व डीपी रस्त्यांचे दर्जेदार कामे सुरू आहेत. श्रीगोपाल धूत म्हणाले, की सर्वजण जमले, ही विजयाची पावतीच आहे. जगताप परिवार नम्रपणे व्यापाऱ्यांच्या मागे उभा आहे.

यावेळी जयद्रथ खाकाळ यांनी एमआयडीसीमध्ये दिलेल्या सुविधांची माहिती दिली. संतोष बोथरा यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीचे सूत्रसंचालन कमलेश भंडारी यांनी केले, संतोष बोथरा यांनी स्वागत केले. विपुल शेटिया यांनी आभार मानले.

Nagar Assembly
Sangram Jagtap: शहर विकासासाठी सामर्थ्य दे; संग्राम जगताप यांचे रेणुकामातेला साकडे

जगताप यांच्यामुळे विकास

आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या कामांमुळे शहराचा विकासाचा वेग वाढला आहे. कोरोना संकट काळातही त्यांनी केलेले मदत कार्य अतुलनीय आहे. असे उत्कृष्ट काम करणाऱ्या आमदारांना आपण सर्वांनी सहकार्य करावे. शहराचा विकास झाला, तरच व्यापाऱ्यांचा व्यापारही वाढतो. जगताप यांच्यामागे सर्व व्यापारी यापूर्वीही उभे होते. आगामी काळातही सहकार्य असेल, असे प्रतिपादन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com