Sangram Jagtap : आमदार जगताप म्हणाले, 'अजितदादा आहेत, म्हणून आम्ही राहिलो'!

Ahmednagar News : राज्य सरकारने नगर शहरातील मूलभूत सोयीसुविधा, विकासकामांसाठी नव्याने 85 कोटी, तर भिंगार शहरासाठी नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.
Sangram Jagtap
Sangram JagtapSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडत असतानाच, नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप Sangram Jagtap यांनी अजितदादांचे कौतुक केले आहे. 'अजितदादा आहेत, म्हणून आम्ही राहिलो', अशा शब्दांत अजितदादांविषयी Ajit Pawar स्तुतिसुमने आमदार जगताप यांनी उधळली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर शहरातील विविध रस्त्यांसाठी सुरुवातीला दीडशे कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. आता पुन्हा राज्य सरकारने नगर Nagar शहरातील मूलभूत सोयीसुविधा, विकासकामांसाठी नव्याने कोटी रुपयांचा तसेच भिंगार शहरातील मूलभूत सोयीसुविधांसाठी नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आमदार संग्राम जगताप यांनी याची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली. नगर शहरात येत्या काळात जवळपास 235 कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागतील, असे आमदार जगताप Sangram Jagtap यांनी या वेळी सांगितले.

Sangram Jagtap
Sangram Jagtap visit Nagar Collector Office : माजी सरपंचाचा अपघाती मृत्यू; आमदार जगतापांनी गाठले जिल्हाधिकारी कार्यालय

आमदार जगताप म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली. पण आपण पहिल्यापासून अजितदादांचीच साथ दिली. अजितदादा आहेत, म्हणून आम्ही राहिलो. माझा हा राजकीय निर्णय नगरकरांसाठी लाभदायक ठरला आहे. यातून नगर शहरासाठी विकासकामांसाठी इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा कोट्यवधीचा निधी उपलब्ध झाला आहे, असेही आमदार जगताप म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार DCM Ajit Pawar यांनी आपल्या विश्वासू आमदाराला भरीव विकासनिधी देऊन नगर शहराच्या विकासासाठी नव्याने पायाभरणी केली आहे. या विकास निधीतून शहरातील रस्ते, नवीन उद्याने, क्रीडांगणे, चौक सुशोभीकरण यासह विविध मूलभूत आणि सोयीसुविधांची कामे मार्गी लावली जाणार आहेत, असे आमदार जगताप यांनी या वेळी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी उपमहापौर गणेश भोसले, संजय चोपडा, अविनाश घुले, अजिंक्य बोरकर, प्रकाश भागानगरे, संजय सपकाळ, संभाजी भिंगारदिवे आदी उपस्थित होते

भिंगारसाठी राज्य सरकारकडून पहिल्यांदाचा निधी

भिंगार शहराचा कारभार संरक्षण मंत्रालयाच्या कँटोन्मेंट बोर्डाच्या अखत्यारीत येतो. भिंगार शहरातील विकासकामे करायची ठरल्यास राज्य सरकारला केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. तरीदेखील भिंगारमधील नागरी भागातील कामांसाठी राज्य सरकारकडून नऊ कोटी रुपयांचा निधी मिळवल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली. दरम्यान, भिंगार शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ncp शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी भिंगार शहरातील कामे प्रामुख्याने खासदारांकडून होणे गरजेचे आहे, पण ती होत नाहीत. आमदार संग्राम जगताप यांनी मात्र भिंगार शहरासाठी राज्य सरकारकडून नऊ कोटी रुपयांचा विकास निधी आणून भिंगारवासीयांना गिफ्ट दिल्याचे सांगितले.

Edited By : Rashmi Mane

R

Sangram Jagtap
MP Sujay Vikhe News : सुजय विखेंच्या उमेदवारीबरोबरच नगर जिल्ह्यात विरोधी उमेदवाराबाबत चर्चांना उधाण!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com