Sangram Jagtap: विकासकामातून समृद्ध नगरची निर्मिती करू : डॉ. सुजय विखे पाटील

Sangram Jagtap: संग्राम जगताप ५० हजार मतांनी विजयी होतील
Nagar Assembly
Nagar AssemblySarkarnama
Published on
Updated on

Sangram Jagtap: आमदार संग्राम जगताप व मी शहर विकासाची संकल्पना हाती घेऊन मुहूर्तमेढ रोवली. अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून आमदार संग्राम जगताप ५० हजार मतांनी विजयी होतील. आता तर चांगले वातावरण आहे.

शहरात ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले जात आहे. त्यांनी केलेल्या विकास कामावर नगरकरांनी विश्वास ठेवला असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक दोनमध्ये विकास यात्रेत नागरिकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी विखे बोलत होते.

माजी नगरसेवक निखिल वारे, विनित पाउलबुधे, बाळासाहेब पवार, रूपाली वारे, संजय बुधवंत, सचिन लोटके, श्रीकृष्ण पवार, विशाल नाकाडे, धीरज उकिरडे, राहुल सांगळे, तसेच मान्यवर या वेळी उपस्थित होते.

Nagar Assembly
Sangram Jagtap: शहराभोवतालच्या गावांचा विकास होणार

जाधव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

गेली ३५ वर्षांपासून शिवसेनेमध्ये कार्यरत असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख विजय जाधव यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह जगताप यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला.

जगताप यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. प्रभाग ११ जगताप यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक अविनाश घुले, माजी नगरसेवक नज्जू पहिलवान, रूपसिंग कदम, संजय चोपडा व प्रकाश भागानगरे, माजी उपमहापौर गणेश भोसले, मुजाहिद कुरेशी, विनोद कदम, कमलेश भंडारी, तसेच मान्यवर उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com