Sangram Jagtap: शहराभोवतालच्या गावांचा विकास होणार

Sangram Jagtap: शिंदे परिवार माझ्यासोबत आल्याने मला बळ मिळाले
Nagar Assembly
Nagar AssemblySarkarnama
Published on
Updated on

Sangram Jagtap: शहराचा विकास होतोय. रस्ते चकाचक होत आहेत. पुढील पंचवीस वर्षे रस्त्यांचे काम करण्याची गरज पडणार नाही, अशी दर्जेदार कामं होत आहेत. शहराबरोबरच जवळील बुरुडगावसारखी जवळील गावे, उपनगरांचा विकास झपाट्याने होणार आहे. शहराचा चेहरामोहरा बदलेल, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केले.

जगताप यांनी उपनगरे, तसेच शहराच्या बाजूच्या गावांत जाऊन नागरिकांशी संवाद साधला. बुरुडगाव येथील माजी नगरसेवक (कै.) अरुण शिंदे यांच्या कुटुंबीयांनी जगताप यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेत त्यांचे स्वागत केले.

संजय शिंदे म्हणाले, की अहिल्यानगर शहर आणि शिवसेना हे एक घनिष्ट नातं आहे; परंतु या निवडणुकीत अहिल्यानगरची जागा शिवसेनेला नसल्याने आम्ही पक्ष आणि राजकारण या पलिकडे कौटुंबिक मैत्री संबंध जपत आमदार जगताप यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Nagar Assembly
Sangram Jagtap visit Nagar Collector Office : माजी सरपंचाचा अपघाती मृत्यू; आमदार जगतापांनी गाठले जिल्हाधिकारी कार्यालय

जगताप आणि शिंदे परिवाराचे गेल्या अनेक वर्षांपासून कौटुंबिक मैत्री संबंध आहेत. त्यामुळे परिवारातील सदस्य मैदानाच्या रिंगणात उतरल्यानंतर त्यांच्या पाठीशी सर्व परिवार उभे राहणे, हे आमचे संस्कार आणि कर्तव्य आहे.

याची जाणीव ठेवून सर्व शिंदे कुटुंबाने एकत्र येत जगताप यांच्या पाठीशी जाहीर खंबीरपणे उभे राहून बुरुडगाव प्रभागातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे.

यावेळी भरत शिंदे, दीपक शिंदे, विश्वराज शिंदे, स्वराज शिंदे, अनिल शिंदे, प्रसाद शिंदे, विक्रांत शिंदे, राहुल शिंदे, विश्वजित शिदे आदींसह महिला उपस्थित होत्या.

जगताप म्हणाले, की बुरुडगावच्या शिंदे परिवाराने शिवसेनेसोबत गेले ४५ ते ५० वर्ष प्रामाणिक एकनिष्ठेने काम केले आहे. अरुणभाऊ शिंदे यांनी राजकारण न करता निःस्वार्थपणे सामाजिक कामे करत बुरुडगावच्या विकासाला प्राधान्य दिले. या निवडणुकीत शिंदे परिवार माझ्यासोबत आल्याने मला लढायला आणखी बळ मिळाले आहे.

Nagar Assembly
Sangram Jagtap: अहिल्यानगर शहर मेट्रोसिटी करू

इतर पक्षातील कार्यकर्त्यांची साथ

शहरातील विविध पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश करीत आहेत. आमदार जगताप यांनी केलेल्या विकासकामांमुळे नागरिक समाधानी आहेत.

भौतिक प्रश्न, आरोग्य, शिक्षण आदींमध्ये विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील इतर पक्षातील कार्यकर्ते जगताप यांच्यामागे उभे आहेत, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com