Prabhakar Gharge: गोरेंना घरी बोलवायचीही सोय राहिली नाही

Prabhakar Gharge: कातरखटावला महाविकास आघाडीच्‍या सभेत घणाघात
Man Assembly
Man AssemblySarkarnama
Published on
Updated on

Prabhakar Gharge: कोणावर व्यक्तिगत बोलण्याचा माझा स्वभाव नाही. मात्र, माझ्यावरच्या टीकेला उत्तर द्यावे लागेल. त्यामुळे मी माझ्या घरात काय करतो हे पाहण्यापेक्षा आमदार गोरे दार लावून काय उद्योग करतात हे जनतेला माहीत आहे. त्यांना घरी बोलवायचीही सोय राहिली नाही. झाकली मूठ सव्वा लाखाची... आता त्यांची आमदारकी जाणार असल्याची खरमरीत टीकाही महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घार्गेंनी केली.

ते कातरखटाव येथील सभेत बोलत होते. त्या वेळी प्रभाकर देशमुख, रणजितसिंह देशमुख, नंदकुमार मोरे, अनिल पवार, डॉ. महेश गुरव, अर्जुनराव खाडे, शशिकला देशमुख, मकरंद बोडके, बाळासाहेब पोळ, काकासाहेब मोरे, तानाजी देशमुख, पोपट मोरे, दिलीप तुपे आदी उपस्थित होते.

Man Assembly
Supriya Sule ट्विट ; Chitra Wagh खवळल्या ! । BJP | NCP | Mumbai local | Sarkarnama Video

घार्गे म्हणाले, ‘‘मी काय केले हे सर्व तालुक्याला माहीत आहे. मी उसाला ३०५० दर दिला. जिथे सुमारे १२ हजार शेतकऱ्यांचा ऊस येतो. ऊसतोड कामगार व तरुणांना नोकऱ्या दिल्‍या. गेल्या १५ वर्षांत कोणताही सहकार, शैक्षणिक, उद्योग व व्यवसाय उभा न करणाऱ्या गोरेंना माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही.

मी जर सकाळी ११ ला उठून दुपारी दोनला झोपत असतो तर तालुक्यासह जिल्ह्यात मी शैक्षणिक, सहकार क्षेत्रांसह समाजकारण, अर्थकारणात व राजकारणात वैभव उभे केले नसते. २००७ मध्‍ये आलेल्‍या पाण्‍याचा उपयोग तुम्‍ही जाहिरातबाजी व इव्हेंटसाठी, तर जनतेचा मतांसाठी वापर केला.

कलेढोण व वरकुटे भागातील शेतकऱ्यांची दिशाभूल केल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमालाही लोक गेले नाहीत. ज्या पाइप कामासाठी आणल्या, त्या दुसऱ्या रात्रीत गायब झाल्या. दुष्काळात येरळवाडी धरणात पाण्याची खरी गरज असताना उत्तर माणला पाण्याचा इव्हेंट कोणी केला? त्यामुळे ऊस जळून गेला व जनतेला पिण्याचे पाणी मिळाले नाही, अशा प्रवृत्तीला घरी बसविण्याची गरज आहे.’’

या वेळी देशमुख म्हणाले, ‘‘गोरेंकडून जातीपातीचे राजकारण होत आहे. मला उमेदवारी मिळाली नसली, तरी प्रभाकर घार्गेच विजयी होणार आहेत. मी मैदान सोडून जाणार नाही. खटाव- माणचा कायापालट करण्यासाठी महाविकास आघाडीला शक्ती द्यावी.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com