Subhash Deshmukh: काँग्रेसने ३० वर्षात दक्षिण सोलापूरसाठी जेवढा निधी आणला त्यापेक्षा जास्त निधी आपण १० वर्षांत आणल्याचे प्रतिपादन भाजपेच उमेदवार, आमदार सुभाष देशुमख यांनी केले. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागातील कोपरा बैठकांत ते बोलत होते.
आमदार देशमुख म्हणाले, मतदारसंघातील शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागाचा विकास केला आहे. यापुढेही आणखी विकासासाठी पुन्हा जनतेने आपल्याला संधी द्यावी. कणबस येथे ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
महिलांनी त्यांचे औक्षण केले. तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, हणमंत कुलकर्णी, नामदेव पवार, अंबिका पाटील, अतुल गायकवाड, प्रेम राठोड, सरपंच चंद्रकांत दुलंगे, लक्ष्मण किरणाळे, उदयकुमार जमा, प्रभुलिंग चिट्टे, सुरेश पाटील, गौरीशंकर बिराजदार, मल्लू चिवडशेट्टी, शिवानंद पुजारी, श्रीशैल कुताटे, यल्लप्पा भातांबरे, राहुल वंजारी, सागर धुळवे उपस्थित होते. जुळे सोलापुरातील रोहिणी नगरातील कोपरा बैठकीत आमदार देशमुख यांनी मतदारांशी विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी सुधाताई अळ्ळीमोरे, संगीता जाधव, सुजाता सुतार, आनंद बिराजदार, महेश देवकर, संदीप हेसे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
इच्छा भगवंताची परिवार देशमुखांच्या पाठीशी
आमदार सुभाष देशमुख यांना तिसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी इच्छा भगवंताची परिवार प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी म्हटले. आमदार देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जाधव यांच्या रेल्वे लाईन्स येथील संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
जाधव यांनी आमदार देशमुख यांचा सत्कार केला. यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, हेमंत चौधरी, महेश निकंबे, आनंद मुस्तारे, चेतन गायकवाड, विशाल गायकवाड, अमोल गायकवाड, महेश देवकर, अभिजित बिराजदार, विशाल पाटील, किरण शिंदे, प्रमोद भोसले, सागर कांबळे, निलेश कांबळे, अमोल जगताप, अशोक जाधव, सिध्दु गायकवाड, अनिस जाधव, अंबादास वैष्णव, जितू भोसले, तेजस गायकवाड, कार्तिक जाधव, उत्कर्ष गायकवाड, ऋषी येवले, शुभम गायकवाड, माऊली जरग, दया जाधव, महादेव राठोड, माणिक कांबळे, वसंत कांबळे आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.