सातारा : सातारा येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे.यातील एका आरोपीला पोलिसांनी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. पुण्यातील मित्राच्या फॉर्म हाऊसवर बनकर लपून बसला होता असे पोलिस सुत्रांनी सांगितले.
मृत डॉक्टर यांनी आत्महत्येपूर्वी तळहातावर सोसाइड नोट लिहिली होती. यात पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे लिहिले असून फलटण शहरामध्ये विद्यानगर येथे राहत असणाऱ्या घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर यांनी तिचा सलग चार महिने मानसिक छळ केला असल्याचे नमूद केले आहे.
अत्याचार आणि शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून फलटण शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली होती.
या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.मृत डॉक्टर महिलेने आत्महत्येपूर्वी तिच्या तळहातावर सोसाइड नोट लिहिली असून त्यामध्ये तिने एक पोलीस अधिकारी गोपाल बदने व घर मालकाचा मुलगा प्रशांत बनकर यांच्यावर बलात्काराचे आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
फलटण येथील शासकीय रुग्णालयात ही महिला डॉक्टर कार्यरत होती. तिने फलटणमधीलच एका हॉटेलमधील खोलीत गळफास घेत जीवन संपवले आहे. आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची चार पथक रवाना झाले आहे.
दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी पोलीस निरीक्षक गोपाल मदने यांचे निलंबन केले आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
"माझ्या मरण्याचं कारण पोलीस निरीक्षक गोपाल मदने ज्याने माझा रेप केला आणि प्रशांत बनकर याने माझा ४ महिने मानसिक, शारिरिक छळ केला." गोपाल मदने हे पोलीस अधिकारी असून, प्रशांत बनकर हे त्या घरमालकाचे पुत्र आहे ज्या घरात डॉक्टर राहत होती. तिने २१ वेळा तक्रारी केल्या होत्या, पण दखल घेतली गेली नव्हती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.