Udayanraje & Shivendraraje : भाजप कार्यालयात दोन्ही राजेंचे फोटो; पदाधिकाऱ्यांतील वाद उफाळण्याची भीती

Dhairyashil Kadam : जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई व आमदार जयकुमार गोरे यांच्यात वाद पेटला आहे. त्यातून देसाई यांनी आमदार गोरेंना थेट आव्हान दिले आहे.
Satara BJP Office
Satara BJP OfficeSarkarnama
Published on
Updated on

Satara BJP News : उदयनराजे समर्थक व जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यात कलगीतुरा रंगलेला असतानाच आज भाजप जिल्हा कार्यालयात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फोटो लावण्यात आले. यापूर्वी भाजपच्या प्रमुख नेत्यांसह आमदार जयकुमार गोरे यांचा फोटो होता. दोन्ही राजांचे फोटो लावण्यासाठी जिल्हा सरचिटणीस संतोष कणसे यांनी पुढाकार घेतला होता.

भारतीय जनता पक्षाचे सातारा शहरात जिल्हा कार्यालय आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore हे जिल्हाध्यक्ष असताना सुरू करण्यात आले. विसावा नाका परिसरात हे कार्यालय सुरू आहे. या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच आमदार जयकुमार गोरे यांची छायाचित्रे होती.

आमदार गोरे यांच्या कार्यकालात हे कार्यालय सुरू झाल्याने त्यांच्या सूचनेनुसार हे कार्यालयाची सजावट झाली होती. त्यानंतर आमदार गोरे यांच्यानंतर धैर्यशील कदम यांच्याकडे भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आली.

जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई व आमदार जयकुमार गोरे यांच्यात वाद पेटला आहे. त्यातून देसाई यांनी आमदार गोरेंना थेट आव्हान दिले आहे. सध्या देसाई हे खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने असल्याचे सांगितले जात आहे. उदयनराजेंच्या तिकिटाबाबत आमदार गोरे यांनी विरोधात भूमिका घेतल्याचा गौप्यस्फोट अनिल देसाई यांनी केला होता.

या वादात धैर्यशील कदम यांनी उडी घेत उदयनराजेंच्या Udaynraje समर्थकांवर बगलबच्चे असा उल्लेख केल्याने उदयनराजेंचे समर्थक आक्रमक झाले होते. यावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण धसके यांनी पत्रक काढून त्यांचा निषेध नोंदविला होता.

Satara BJP Office
Maharashtra Politics : महायुतीत विधानसभा निवडणुकीची तयारी; आता मंत्रिमंडळ विस्तार? 'या' नेत्यांना संधी

जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना पत्रकार परिषदेत दोन्ही राजांचे फोटो कार्यालयात का नाहीत, अशी ही विचारणा झाली होती. त्यावर त्यांनी आमदार गोरेंच्या कार्यकाळात सजावट केलेली आहे. मी कोणताही बदल केलेला नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. दोन्ही राजांचे फोटो भाजप कार्यालयात नाहीत, याची सल त्यांच्या कार्यकर्त्यांत होती.

आता याबाबत जिल्हा सरचिटणीस संतोष कणसे यांनी पुढाकार घेत खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे फोटो तातडीने कार्यालयात लावले. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी हे पॅचअप करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले आहे. धैर्यशील कदम यांच्याविषयी उदयनराजे समर्थकांत प्रचंड नाराजी आहे. आता दोन्ही राजांचे फोटो भाजप कार्यालयात झळकल्याने त्यांच्या समर्थकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Satara BJP Office
Narendra Modi In Mumbai : लोकसभेत भोवलेल्या विरोधकांच्या 'त्या' दाव्यातली मोदींनी हवाच काढली! थेट RBI चे आकडेच सांगितले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com