PM Modi Inaugurate Atal Setu: 'अटल सेतू'चे उद्घाटन मोदींच्या हस्ते पण संकल्पना काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांची

Atal Setu: या हार्बर लिंक उभारणीसाठी निधीची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्राकडे केली होती.
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी न्हावा-शेवा-अटल सेतूचे उद्घाटन शुक्रवारी (दि.12 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. खरं तर हार्बर लिंक उभारणी कामाची मुहूर्तमेढ काँग्रेस सरकारने सुरू केली.

यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्राकडे केली होती. तेव्हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची पायाभरणी आणि उद्घाटन नरेंद्र मोदींनी केले असले तरी मूळ संकल्पना काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची आहे.

रोजी अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी न्हावा शेवा अटल सेतू' चे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले असले तरी त्या सेतूच्या उभारणीसाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून 22 ऑक्टोबर 2012 ला या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prithviraj Chavan
PM Modi Speech : जिथे मोदींची गॅरंटी सुरू होते तिथे... : पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

मुंबईचे वाढते ट्राफिक यामधून पुण्याला जाणाऱ्या 'एक्सप्रेसवे'ला जलद पोहचण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी मुंबई मधून बाहेर पडणारा फ्री वे व त्यालाच जोडणारा हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हे दोन्ही पूल उभारण्याची संकल्पना होती. या दोन पूलामधील 'फ्री वे' पूल पृथ्वीराज चव्हाण यांच्याच कार्यकाळात पूर्ण झाला. पण समुद्रावरील ट्रान्स हार्बर लिंक या पुलाच्या कामाला पूर्ण होण्यास वेळ लागला व तो पूल आता सत्यात उतरतोय.

सन 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने हा पूल उभारण्याच्या सर्व कामांची मंजुरी पूर्ण करून प्रस्ताव केंद्र सरकारकडे निधीच्या मंजुरीसाठी पाठवला होता. त्या प्रस्तावाला 2013 ला निधीची मंजुरी तत्कालीन अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी दिली व निधीची तरतूद सुद्धा झाली.

त्यानंतर फडणवीस सरकार व उद्धव ठाकरे सरकारच्या काळात या पूल उभारणीला गती मिळाली आणि आता या पुलाचे लोकार्पण होत आहे. या नव्या मार्गामुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर केवळ 20 ते 22 मिनिटांत पार करता येईल, असं सांगितलं जातंय.

'काँग्रेसच्या कामांचे भाजपकडून उद्घाटन'

मुंबई, पुणे व नागपूर येथील मेट्रो प्रोजेक्ट असो किंवा मुंबईतील मोनोरेल प्रोजेक्ट असो, असे अनेक मोठ्या शहराच्या दृष्टीने महत्वाचे असणारे प्रोजेक्ट मंजुरीचे काम व ते सत्यात उतरविण्यासाठीची कल्पना आणि डिझाईन हे सर्व काँग्रेसच्या काळातच झाले होते. ती कामे इतकी दूरदृष्टीची होती की त्या प्रोजेक्टचे उदघाट्न अजूनही भाजप सरकार करत आहेत.

पण कामे काही संपलेली नाहीत, साधा विषय आहे. ज्या प्रोजेक्टला मंजुरी मिळाली आणि निधीची तरतूद झाली आहे, असे प्रोजेक्ट थांबवता येत नाहीत. आमच्या काळातील पूर्ण होतातच पण त्यांचे उदघाट्न कोणाच्या काळात होतायत ते दिसतंय,अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी दिली.

(Edited By- Ganesh Thombare)

Prithviraj Chavan
Narendra Modi : मोदींची हटके स्टाईलमध्ये 'एन्ट्री...' मुंबईतील कार्यक्रमात नेमकं काय झालं ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com