Modi Malshiras Visit: साखर कारखान्यांच्या आयकराचा प्रश्नही पवारांनी सोडवला नाही; मोदींचे टीकास्त्र

PM Modi Live From Madha Lok Sabha: दहा वर्षांत आम्ही अनेक कामे केली. २०१४ पूर्वी आघाडीचे सरकार होते, तेव्हा राज्याची काय परिस्थिती होती, हे तुम्हाला माहीत आहे. अनेक रखडलेले प्रकल्प आम्ही मार्गी लावले, असे मोदी यांनी सांगितले.
PM Modi Live From Madha Lok Sabha
PM Modi Live From Madha Lok SabhaSarkarnama

Malshiras News: माढा मतदारसंघात रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

माळशिरस येथे (PM Modi Live from Madha Lok Sabha) झालेल्या सभेत मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता टीका केली. येथील दुष्काळी भागात पाणी आणण्याचे वचन येथील नेत्याने दिले होते. महाराष्ट्रातील लोक वचन पूर्ण न करणाऱ्यांचा हिशोब ठेवतात. आघाडीचे नेते मोठमोठ्या गोष्टी करतात. या नेत्याची (PM Modi on Sharad Pawar) येथून निवडणूक लढण्याची हिंमत नाही, असे मोदी म्हणाले.

PM Modi Live From Madha Lok Sabha
Modi Malshiras Speech : आता शरद पवारांना शिक्षा देण्याची वेळ आलीय; माळशिरसमधून मोदींचा नाव न घेता हल्लाबोल

मोठे कृषिमंत्री होते तेव्हा उसाचा एफआरपी २०० रुपये होता. आमचे सरकार आल्यावर आम्ही एफआरपीमध्ये वाढ केली. आता उसाचा एफआरपी ३५० रुपये आहे. त्यांनी (शरद पवार) साखर कारखान्यांच्या आयकरांचा प्रश्नही सोडवला नाही. दहा वर्षांत आम्ही अनेक कामे केली. २०१४ पूर्वी आघाडीचे सरकार होते, तेव्हा राज्याची काय परिस्थिती होती, हे तुम्हाला माहीत आहे. अनेक रखडलेले प्रकल्प आम्ही मार्गी लावले, असे मोदी यांनी सांगितले.

तुमची संपत्ती लुटणारे सरकार तुम्हाला पाहिजे का, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. मतांच्या राजकारणामुळे काँग्रेसने राम मंदिर उभारण्यास उशीर केला, असा आरोपही मोदींनी केला.

माळशिरस येथे झालेल्या सभेची सुरुवात मोदींनी मराठीतून केली. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी येळकोट-येळकोटचा जयघोष केला. भाषणापूर्वी त्यांना धनगर समाजाने त्यांना पिवळा फेटा आणि घोंगडी भेट दिली होती.

माळशिरसच्या सभेत मोदी म्हणाले...

  • श्रीरामाबद्दल कोणतीही आस्था काँग्रेसची नाही.

  • आम्ही राम मंदिर बांधल्याने 500 वर्षांची प्रतीक्षा संपली.

  • ज्यांच्याकडे कधी काळी 400 खासदार होते तो काँग्रेस पक्ष आता 300 जागाही लढवत नाही.

  • रणजित नाईक निंबाळकरांना तुम्ही मत द्या, तुमचे मत मोदींनी मिळेल.

  • काँग्रेसने गेल्या 60 वर्षांत गरिबी हटायेंगे एवढीच घोषणा दिली.

  • आम्ही गेल्या 10 वर्षांत 25 कोटी लोकांना गरिबीतून मुक्त केले.

  • R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com