Police Demanding Bribe To Farmer: शेतकऱ्याकडे लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराविरुध्द गुन्हा

Indapur Police : भिगवण पोलीस ठाण्यातील प्रकार
ACB Logo
ACB LogoSarkarnama

Police Ask for Bribe to Farmer : शेतकऱ्याकडे २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यातील हवालदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाने (एसीबी) ही कारवाई केली.

रामदास लक्ष्मण जाधव असे त्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. शेतजमिनीच्या वादातून भिगवण पोलिसांनी शेतकऱ्याचा ट्रॅक्टर जप्त केला होता. ट्रॅक्टर सोडविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर हवालदार जाधव याने शेतकऱ्याकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली. परंतु तडजोडीनंतर २० हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले.

ACB Logo
Ravindra Dhangekar : रवींद धंगेकरांचा सांगोल्यात शरद पवारांच्या हस्ते होणार सत्कार; लोणारी समाजाच्या वतीने आयोजन

या संदर्भात संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये पोलीस हवालदार जाधव याने तक्रारदार शेतकऱ्याकडून २० हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com