Kolhapur News : मुश्रीफ ईडीच्या फेऱ्यात, तर बंटी पाटील ‘राजाराम’मध्ये; कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीला रंगत येईना

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत यंदा उच्चांकी साडेसहाशेवर उमेदवारी अर्ज वैध ठरलेले आहेत.
Kolhapur market committee election
Kolhapur market committee electionSarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) शेती समितीची निवडणूक जाहीर होऊन अर्ज माघारीची मुदत जवळ आली आहे. मात्र, पक्षीय पातळीवर अजूनही शांतता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत, तर आमदार सतेज पाटील (Satej Patil) हे राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. भाजपमध्येही शांतता आहे. शिंदे व ठाकरे गटाच्या हालचाली सुरू आहेत, पण तिथंही निर्णय होताना दिसत नाही, त्यामुळे कोल्हापूर बाजार समितीत निवडणुकीचा माहौल दिसून येत नाही. (Political leaders away from Kolhapur market committee election)

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत यंदा उच्चांकी संख्येने अर्ज आलेत. त्यातील साडेसहाशेवर उमेदवारी अर्ज वैध ठरलेले आहेत. मात्र, राजकीय पक्षनेत्यांच्या पातळीवर पॅनेलबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. बाजार समितीच्या निवडणुकीबाबत राजकीय नेत्यांनी सुरवातीपासूनच सावध पवित्रा घेतला आहे.

Kolhapur market committee election
Nilesh Lanke's Warning : ‘मला मागचा नीलेश लंके व्हायला लावू नका’ : आमदार लंकेंनी कोणाला दिला इशारा...

कोल्हापूर शेती समितीच्या संचालक मंडळावर आजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांचे वर्चस्व राहिले आहे, तेच यंदा या निवडणुकीपासून प्रथमच अलिप्त राहिले आहेत. ईडी प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातून राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता आहेत. राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आमदार सतेज पाटील गुंतले आहेत. त्यामुळे बाजार समिती निवडणुकीबाबत त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही.

Kolhapur market committee election
Market Committee Election : नगर बाजार समितीत प्रत्येक शेतकऱ्याला मोफत नाश्ता : नीलेश लंकेंची घोषणा

शेतकरी कामगार पक्षाचे चार उमेदवारी यादी घेऊन बसले आहेत. भाजपमध्ये काहीच हालचाली नाही. ठाकरे गटात जिल्हाध्यक्षांनी संभाव्य उमेदवारांशी केवळ चर्चा करून ठेवली आहे, तर शिवसेना शिंदे गटाकडे जाण्यासाठी उमेदवारांची घाई सुरू आहे. तिथेही कोणताही निर्णय झालेला नाही.

Kolhapur market committee election
Nilesh Lanke News : होय, ईडीवाले माझ्याकडे आले आणि येडे होऊन गेले : ईडी चौकशीच्या चर्चेवर नीलेश लंकेंचे भाष्य

येत्या २० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. मात्र, राजकीय हालचालची थंडावल्या असल्याने पॅनेल तयार नाही. जोपर्यंत पॅनेल तयार होऊन शक्ती प्रदर्शन होत नाही, तोपर्यंत अनेकजण वाट पाहत आहेत. यातही पक्षीय पॅनेलमध्ये स्थान मिळाले, तरच निवडणूक लढविण्याचा मनसुबा असलेले काहीजण आहेत, त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे तूर्त थांबवले आहे. असे चित्र कायम राहिले तर उमेदवार यादी लांबणार असून मतदारही चकीत होतील, अशी स्थिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com