प्राजक्त तनपुरे म्हणाले, कुटील डाव तुमच्यावरच उलटवू...

महाविकास आघाडीच्या ( Mahavikas Aghadi ) एका कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी नाव न घेता भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिलेंवर ( Shivaji Kardile ) आरोप केले.
prajakt tanpure
prajakt tanpureSarkarnama

अहमदनगर : महाविकास आघाडीच्या ( Mahavikas Aghadi ) एका कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी नाव न घेता भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिलेंवर ( Shivaji Kardile ) आरोप केले. Prajakt Tanpure said, we will turn the insidious innings on you ...

राज्यमंत्री तनपुरे हे नागरदेवळे (ता. नगर) येथे महेश झोडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. तनपुरे म्हणाले, आम्ही राजकारण कटकारस्थाने याच्या नादी न लागता लोकांची कामे करण्यावर भर देतो. मात्र, काहीजण पराभवाच्या नैराश्‍यातून अजून बाहेर पडलेले दिसत नाही. आपल्या राजकारणाला अडचण ठरणाऱ्या निष्पाप कार्यकर्त्यांना विनाकारण खोटया पोलिस केसेसमध्ये अडकवण्याचे विषारी राजकारण सुरू झाले आहे. आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला तर हा कुटील डाव तुमच्यावरच उलटवू, असा इशारा नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला.

prajakt tanpure
प्राजक्त तनपुरे आणि जयंत पाटील यांची विकासात्मक बाबींवर जुगलबंदी रंगली

राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते रक्‍तदात्यांचा गौरव करण्यात आला. तसेच थंडीपासून बचावासाठी ब्लॅकेंटचे वाटप करण्यात आले. कराटे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत, संदीप गुंड, रोहिदास कर्डिले, केशव बेरड, प्रवीण कोकाटे, दत्ता तापकिरे, सचिन जाधव, अनिल बोरुडे, अभिषेक भगत, अमोल जाधव यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com