तुळसीदास मुखेकर
तिसगाव ( जि. अहमदनगर ) - राज्यात महावितरणकडून भारनियमन सुरू आहे. केंद्र सरकारमुळे भारनियमनाची वेळ आली असून लवकरच भारनियमन कमी करणार असल्याचे राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी सांगितले आहे. ( Prajakta Tanpure said that weight regulation will be reduced soon )
मिरी -तिसगाव रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी पंचायत समिती सदस्य राहुल गवळी, शिवशंकर राजळे उपस्थित होते.
प्राजक्त तनपुरे म्हणाले की, महाराष्ट्रासह इतरही राज्यात विजेचा तुटवडा आहे. मात्र महाराष्ट्रातील वीज तुटवडा हा केंद्र सरकारमुळे उदभवला आहे. केंद्रामुळेच भारनियमन करण्याची वेळ आली असून लवकरच भारनियमन कमी करणार असल्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
तनपुरे पुढे म्हणाले, की कोळश्याच्या खाणी केंद्र सरकारच्या ताब्यात आहेत. त्यामुळे कोळसा खरेदी करताना अडचणी येत आहेत. राज्य सरकार चढ्या भावाने विज खरेदी करून भारनियन कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे लवकरच भारनियमन कमी होणार आहे. राज्य शासन मूलभूत गरजांना प्राधान्य देत आहे. जनतेच्या गरजा ओळखून त्यानुसार खऱ्या अर्थाने निधी उपलब्ध करून दिला जात आहे. रस्ते, वीज, पाणी या कामांसाठी मात्र जास्तीत जास्त निधी देण्याचे काम केले जात आहे. मतदार संघात गेल्या काही वर्षापासून विजेची कामेच झाली नाहीत. मिरी येथे जनता दरबारात सुमारे 240 प्रश्न जागेवरच मार्गी लावले.
याप्रसंगी माजी सभापती संभाजी पालवे, भाऊसाहेब लवांडे, उपसभापती महादेव पाटील कुटे, सुभाष गवळी, आदिनाथ सोलाट, एकनाथ झाडे, राजू शेख, भागीनाथ गवळी, आदी उपस्थित होते.
नवीन सबस्टेशनला मंजुरी
सबस्टेशची क्षमता वाढवणे, रोहित्र वाढवणे, नवीन सबस्टेशन निर्माण आदी कामे तातडीने हाती घेतली आहेत. मिरी सबस्टेशनवर वीजेची मागणी वाढली आहे. यासाठी शिराळ येथे नवीन सबस्टेशनला मंजुरी देण्यात आली आहे. नवीन सबस्टेशन झाल्यानंतर मिरी परिसराचा विजेचा प्रश्न मार्गी लागेल. मढी, तिसगावचा वीज प्रश्नही निकाली काढला आहे. तिसगावचा पाणी प्रश्न 50 वर्षांपासून रखडला होता, तोही कायमचा मार्गी लावला आहे, असेही तनपुरे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.