Jarange - Fadnavis controversy and Prakash Ambedkar : 'मी जसं म्हणालो ओबीसी हा भाजपबरोबर आहे. आज जर तुम्ही बघितलं असेल की, ओबीसी जरांगे पाटलांच्या भूमिकेला कुठेही विऱोध करत नाही. आपण राजकारण समजून घेतलं पाहीजे. जरांगे पाटील फडणीसांना शिव्या देताय, तुम्हाला वाटतं जरांगे पाटील आणि फडणवीस यांच्यात भांडण झालं. पण मला वाटतं हे नकली भांडण आहे.' असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे.
आपल्या या विधनाबाबत स्पष्टीकरण देताना पंढरपूरमधील आरक्षण बचाव यात्रेत प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) सांगितलं की, 'कुणाच्या लक्षात आलं आहे का की हे नकली भांडण आहे. भाजपने जर ओबीसींच्या बाजूने भूमिका घेतली आणि जरांगेंनी जर फडणवीसांना लक्ष्य केलं, तर मी समजू शकतो की हे भांडण आहे. पण देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने भूमिका घेतलीच नाही. तरीही जरांगे फडणवीसांना लक्ष्य करत आहेत.
राजकारण तुमच्या लक्षात आलं का? दाखवायचे दात एक आणि खायचे दात वेगळे. दाखवायचे दात का तर आम्ही असताना जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांना(Devendra Fadnavis) शिव्या देताय आणि खायचे दात म्हणजे ओबीसीने भाजपला मतदान द्यावं.'
याशिवाय 'ओबीसीने भाजपला मतदान दिलं, तर उद्या ओबीसी भाजपला विचारू शकतो का की तुम्ही आमच्याबाजूने मतदान का नाही केलं. नाही, का नाही तर तो सरळ सांगेल की मी तर या प्रश्नावर भूमिका घेतलीच नाही. मी जरांगे पाटील(Manoj Jarange) यांच्या मागणीला विरोध केलेलाच नाही. जरांगे पाटील यांच्या मागणीला आम्ही विरोध केलेला नाही, तुम्ही आम्हाला मतदान दिलेलं आहे. याचा अर्थ आम्हाला जे पाहीजे ते करायचं आहे आणि आम्हाला जे पाहीजे म्हणजे जरांगे पाटील यांना जे पाहीजे तेच आम्हाला करायचं आहे.'
'तुम्ही अजून स्वत:ला फसवून घेवू नका. राजकारण समजा. दाखवायचे दात एक अन् खायचे दात वेगळे. तुम्ही सांगितलं पाहीजे दाखवायचे दात आणि खायचे दात एकच असले पाहीजे, तरच मत मागायला ये नाहीतर अजिबात मत मागायला येवू नकोस. म्हणून उद्याच्या असणाऱ्या या कालावधीत आपल्याला शांतात राखायची आहे. जे राजकीय मत आहे ते राजकीय मत राहीले पाहीजे ते सामाजिक मत होता कामानये. गावामध्ये वाद होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहीजे आणि ती दक्षात घेत आपण आरक्षण वाचवू या एवढच मी आपल्याला आवाहन करतो.'
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.