प्रशांत बंब यांनी विभानसभेत मांडली साईसंस्थानच्या कंत्राटी कामगारांची व्यथा

ही मागणी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब ( Prashant Bamb ) यांनी आज (गुरुवारी) औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली.
prashant bamb
prashant bambSarkarnama

Prashant Bamb : साईसंस्थानच्या 584 कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करावे. त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने वेतनासह अन्य फायदे मिळावेत. यापूर्वी 1052 कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले, त्याच पद्धतीने या कामगारांबाबतदेखील निर्णय व्हावा, अशी मागणी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब ( Prashant Bamb ) यांनी आज (गुरुवारी) औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली.

हे कर्मचारी रिकाम्या हाताने निवृत्त होत आहेत, असे सांगत त्यांनी एका निवृत्त कामगाराचे छायाचित्रदेखील सभागृहात दाखविले. त्यांच्या औचित्याच्या मुद्द्यामुळे, तेरा वर्षांपासून प्रलंबित आणि या कामगारांच्या जीवनाशी निगडित असलेला हा प्रश्न आज पुन्हा एकदा चर्चेत आला.

prashant bamb
प्रशांत बंब म्हणाले, सरपंच जनतेतूनच यायला हवा...

या कामगारांच्या बरोबरीचे 1052 कामगार 2009 मध्ये सेवेत कायम झाले. या 584 कंत्राटी कामगारांबाबतही असाच निर्णय होणे अपेक्षित होते. दुर्दैवाने त्यात कुठले ना कुठले अडथळे येत गेले. तब्बल अकरा वर्षांनी म्हणजे 2020 मध्ये त्यांना आस्थापनेवर घेण्यात आले. मात्र, कुठलीही पगारवाढ आणि सुविधा देण्यात आल्या नाहीत. तीन महिन्यांपूर्वी रजा आणि सुट्या मंजूर करण्यात आल्या.

prashant bamb
आमदार प्रशांत बंब आणि पोलिस अधिकाऱ्यांत हमरीतुमरी

या दुर्दैवी कामगारांची संख्या 598 होती. मात्र, काळाच्या ओघात त्यांतील काही रिकाम्या हाताने निवृत्त झाले, तर काहींचे निधन झाले. आता कामगारांची संख्या 584 वर आली आहे. त्यातील आणखी काही कामगार निवृत्तीच्या वाटेवर आहेत. यातील अकुशल कामगारांना दरमहा दहा ते बारा हजार रुपये, तर कुशल कामगारांना त्याहून थोडे अधिक वेतन मिळते.

वीस-बावीस वर्षांहून अधिक सेवा करूनही पदरात काही पडत नसल्याने हे कामगार निराश झाले आहेत. आता या औचित्याच्या मुद्द्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. याप्रश्नी आमदार बंब आणि डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी राज्याच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com