Koregaon Political News : कोयना प्रकल्पग्रस्तांनी त्याग करून संपूर्ण महाराष्ट्राला नवसंजीवनी दिली आहे. त्यांच्या हितासाठी यापुढे काम केले जाणार आहे. आम्ही केवळ बोलत नाही, तर काम करून दाखवतो. यापूर्वीच्या नेतृत्वाने केवळ नारळ फोडण्याचे काम केले. आम्ही प्रत्यक्ष विकासकामे करून जनतेला दाखवून दिली आहेत, असा विश्वास कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला.
कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित सर्व प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवण्याबरोबर पाणीप्रश्नदेखील येत्या काही दिवसांत निकाली काढण्याची घोषणा आमदार महेश शिंदे यांनी केली. कोयना प्रकल्पग्रस्त खिरखिंडी (ता. कोरेगाव) ग्रामपंचायतीचे Koregaon उपसरपंच सचिन हरिबा जाधव व सदस्यांनी आमदार महेश शिंदे गटात Mahesh Shinde प्रवेश केल्याच्या निमित्ताने गावातील जननी पद्मावती देवी मंदिरात झालेल्या स्वागत कार्यक्रमात आमदार शिंदे बोलत होते.
महेश शिंदे म्हणाले, कोयना प्रकल्पग्रस्तांनी त्याग करून संपूर्ण महाराष्ट्राला नवसंजीवनी दिलेली आहे, त्यांच्या हितासाठी यापुढे काम केले जाणार आहे. आम्ही केवळ बोलत नाही, तर काम करून दाखवतो. यापूर्वीच्या नेतृत्वाने केवळ नारळ फोडण्याचे काम केले. आम्ही प्रत्यक्ष विकासकामे सुरू करून जनतेला दाखवून दिली आहेत.
या वेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पोपटराव करपे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नीलेश यादव, तसेच मुंबई मंडळ व खिरखिंडी येथील बौद्धजन विकास मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी उपसरपंच जाधव, ग्रामपंचायत सदस्या कुसुम संकपाळ, सीताबाई जाधव, ताईबाई जाधव, लता पवार, सुनीता जाधव, चित्रा क्षीरसागर यांनी आमदार महेश शिंदे गटात प्रवेश केला. त्यांचे आमदार शिंदे यांनी स्वागत केले. या वेळी कोयना प्रकल्पग्रस्त गावांतील ग्रामस्थ मंडळाचे सदस्य, तरुण मंडळ, महिला मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Edited By Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.