पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आमदार जयकुमार गोरेंना हा शब्द...

नवीदिल्ली New Delhi येथे आज आमदार MLA जयकुमार गोरे Jaykumar Gore यांनी पंतप्रधान Priminister नरेंद्र मोदी Narendra Modi यांची भेट घेतली. यावेळी जिहे-कठापूर Jihe katapur Project योजनेसंदर्भात चर्चा केली.
Ranjit Nimbalkar, Sadabhau Khot, Jaykumar Gore, Narendra Modi
Ranjit Nimbalkar, Sadabhau Khot, Jaykumar Gore, Narendra Modifacebook
Published on
Updated on

सातारा : खटाव आणि माण तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश केला जाईल. तसेच योजनेसाठी लागणारा निधी लवकरात लवकर उपलब्ध केला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माण, खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना दिले. तसेच या योजनेच्या उद्घाटनप्रसंगी आपण उपस्थित राहणार असल्याचाही शब्द त्यांनी दिला.

नवीदिल्ली येथे आज आमदार जयकुमार गोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी जिहे-कठापूर योजनेसंदर्भात चर्चा केली. यावेळी माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत जिहे कठापूर योजनेचा समावेश करा, अशी मागणी आम्ही केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे केली होती. त्याच अनुषंगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट जिहे कठापूरबाबत सकारात्मक चर्चा केली.

Ranjit Nimbalkar, Sadabhau Khot, Jaykumar Gore, Narendra Modi
राष्ट्रवादी हा भांडण लावणारा पक्ष; माणमध्ये फक्त जयकुमार गोरेंचेच सरकार...

खटाव आणि माण या कायम दुष्काळी तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी या योजनेचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करावा. किंवा नाबार्ड ग्रामीण पायाभूत विकासनिधी अंतर्गत नवीन मालिका २७ मध्ये समावेश करुन लागणारा सर्व निधी मिळावा, अशी मागणी जलशक्ती मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री गजेंदरसिंह शेखावत यांच्याकडे केली आहे, असे पंतप्रधान मोदी यांना सांगितले.

Ranjit Nimbalkar, Sadabhau Khot, Jaykumar Gore, Narendra Modi
वारं कुठं वाहतंय..याचा अंदाज घेण्यासाठी मी माण तालुक्यात.... 

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच या योजनेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहणार असून या योजनेला आर्थिक बजेटमध्ये तरतूद करून निधी देण्यात येईल असेही सांगितले. माण, खटाव मतदार संघाचे नेतृत्व करत असताना देशाच्या पंतप्रधानांशी थेट चर्चा करण्यासाठी वेळ मिळाली हे माझे भाग्य आहे, अशी प्रतिक्रिया आमदार गोरे यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com