Prithviraj Chavan News : पूजा खेडकर प्रकरणावरून पृथ्वीराज चव्हाणांचा थेट पंतप्रधान मोदींवरच निशाणा!

Prithviraj Chavan On PM Modi Over Pooja Khedkar Case : ज्या चुका 'या' मंत्रालयाकडून झाल्या आहेत त्याची जबाबदारी मंत्रालयावर व मोदींवरही येते. असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
Prithviraj Chavan and Modi
Prithviraj Chavan and ModiSarkarnama
Published on
Updated on

Prithviraj Chavan Reaction on Puja Khedkar Case : 'प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्यावर बोगस दाखल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. त्यांना काय शिक्षा होईल हा ज्या त्यावेळचा विषय आहे. केंद्र सरकारच्या डीओपीटी मंत्रालयाच्या आधीन राहून युपीएससी काम करते. या मंत्रालयाचा कारभार पंतप्रधान मोदींकडे असून ज्या चुका या मंत्रालयाकडून झाल्या आहेत त्याची जबाबदारी या मंत्रालयावर व मोदींवरही येते.

त्यामुळे याप्रकरणी युपीएससीचे माजी अध्यक्ष मनोज सोनी व त्यांच्या विभागाची सीबीआय चौकशी करावी.', अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

आयएएस पूजा खेडकर(Pooja Khedkar) प्रकरणाविषयी आज सातारा शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'केंद्र सरकारच्या डीओपीटी या मंत्रालयच्या आधीन युपीएससी काम करते. या मंत्रालयाचा कारभार पंतप्रधान मोदींकडे असून ज्या चुका झाल्या आहेत, त्यांची जबाबदारी या मंत्रालयाची आहे. त्यामुळे एकुणच ही जबाबदारी मोदींवर येते.'

Prithviraj Chavan and Modi
Prithviraj Chavan News : महाराष्ट्रातील शेतकरी व शेतमजुरांच्या आत्महत्यांवरून पृथ्वीराज चव्हाणांचे मोदी सरकारवर टीकास्त्र!

तसेच 'युपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. सोनी हे गुजरातचे असून मोदींचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना वयाच्या ३९ व्या वर्षी उपकुलगुरु होण्याचा मान मिळाला आहे. राजीनामा देऊन ते खेडकर प्रकरणाची जबाबदारी टाळू शकत नाहीत. राज्यातील हजारो विद्यार्थी स्पर्धा परिक्षा देतात. काहीवेळेस पेपर फुटतात, हे आताच का होत आहे, असा प्रश्न करुन चव्हाण म्हणाले, स्पर्धा परिक्षेचा नियम मोडून राजकीय व्यक्तीला मदत करणे हे निंदनीय आहे. त्यामुळे सोनी यांची व त्यांच्या विभागाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी देखील पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) यांनी केली आहे.

Prithviraj Chavan and Modi
Prithviraj Chavan On Devendra Fadnavis : 'फडणवीसांना थोडीतरी लाजलज्जा असेल तर...', पृथ्वीराज चव्हाण संतापले

याचबरोबर युपीएससीत मोदींच्या(PM Modi) अखत्यारीतील या मंत्रालयाने किती लोकांना आतापर्यंत युपीएससीच्या माध्यमातून घुसवले आहेत, याचा शोध घ्यावा. सोनी यांचा राजीनामा हा राजकीय दबावातून झाला आहे की आगामी निवडणूक लढविण्यासाठी हे केले आहे? एकुणच या प्रकारात आणखी कोणा मंत्र्याचा हात आहे का, मंत्रालयातील सगळी व्यवस्था बिघडली आहे?', अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com