Prithviraj Chavan News : महाराष्ट्रातील शेतकरी व शेतमजुरांच्या आत्महत्यांवरून पृथ्वीराज चव्हाणांचे मोदी सरकारवर टीकास्त्र!

Prithviraj Chavan on Modi government : केंद्राच्या विविध योजना व अनुदान वाटप करुन शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही, असंही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

'महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांत शेतकरी व शेतमजुरांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून आपले राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे हे राज्याच्या दृष्टीने भूषणावह नाही. याला केंद्र सरकारची शेतकरी विरोधी धोरणे जबाबदार असून त्यामुळेच शेतकऱ्यांनी लोकसभेला महायुतीला कडाडून विरोध केला. आता विधानसभेतही शेतकरी विरोध करतील आणि महाराष्ट्रात निश्चित सत्ता परिवर्तन होईल.', असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

सातारा शासकिय विश्रामगृहात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्येवरुन केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.

Prithviraj Chavan
Prithviraj Chavan On Devendra Fadnavis : 'फडणवीसांना थोडीतरी लाजलज्जा असेल तर...', पृथ्वीराज चव्हाण संतापले

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'नॅशनल क्राईम रेकॉड ब्युरो हा गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतो. या संस्थेच्या माहितीनुसार 2020 मध्ये देशात शेतकरी, शेतमजूरांच्या आत्महत्या झाल्या. त्यापैकी 37.6 टक्के आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. 2021मध्ये एक लाख 64हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. त्यापैकी राज्यात 37.5 टक्के तर 2022च्या आकडेवारीनुसार 37.6 टक्के होती.'

याशिवाय 'सलग तीन वर्षे आत्महत्येच्या आकडेवारीत महाराष्ट्र आघाडीवर असून त्याची टक्केवारी 37.8 आहे. मागील सहा महिन्यांच्या अहवालात आतापर्यंत राज्यातील 1267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून यामध्ये अमरावती विभागात 557, नागपूर विभागात 430, नाशिक 137 तर पुणे 13 आणि कोकणात शून्य आहे.

Prithviraj Chavan
Ravikant Tupkar Vs Raju Shetti : 'स्वाभिमानी'तून हकालपट्टीनंतर रविकांत तुपकरांना धक्का! म्हणाले, राजू शेट्टींनी...

तीन वर्षांचे आकडेवारी पाहिली तर देशातील 38 टक्के प्रमाण राहिले असून शेतकऱ्यांच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला क्रमांकावर आहे. लोकसभेला देशातील शेतकऱ्यांनी मोदी सरकारला कडाडून विरोध केला होता. हमी भाव नाही, कांदा निर्यांत बंदी, शेतकरी विरोधी धोरणे याचा राग शेतकऱ्यांत असून हे सरकार जाणार नाही तोपर्यंत शेतकरी विरोध करत राहणार आहेत.

आगामी विधानसभेच्या निवडणुकीतही हा विरोध दिसून येईल. केंद्राच्या विविध योजना व अनुदान वाटप करुन शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही. दरडोई उत्पन्नात जुलै 2023मध्ये महाराष्ट्र 14 वा क्रमांक आहे, असे त्यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com