Koregaon Political News : पुरोगामी पक्ष, संघटना आक्रमक; केली अमित शहा, देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

Koregaon कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर आज सकाळी काँग्रेस,रिपब्लिकन सेना, संभाजी ब्रिगेड आदी पुरोगामी पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक जमा झाले.
Koregaon Andolan
Koregaon Andolansarkarnama
Published on
Updated on

-पांडुरंग बर्गे

Koregaon Political News : मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचार व संभाजी भिडे यांच्यावर कारवाईत टाळाटाळ केल्याप्रकरणी केंद्रीय आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस, रिपब्लिकन सेना, संभाजी ब्रिगेड यांच्यासह पुरोगामी पक्ष, संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली. कोरेगाव तहसील कचेरीसमोर निषेधाच्या घोषणा देत या पक्ष, संघटनांनी धरणे आंदोलन केले.

कोरेगाव Koregaon तहसीलदार कार्यालयासमोर आज सकाळी काँग्रेस, रिपब्लिकन सेना, संभाजी ब्रिगेड आदी पुरोगामी पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक जमा झाले. त्यानंतर या सर्वांनी मणिपूरतील Manipur महिला अत्याचार, महाराष्ट्रातील मनोहर कुलकर्णी तथा संभाजी भिडेंच्या Sambhaji Bhide निषेधाच्या घोषणा दिल्या.

मणिपूर राज्यात महिलांवर झालेल्या अत्याचाराचा अनेकांनी तीव्र शब्दांत निषेध करत संबंधितांवर वेळेत कारवाई करण्यात, प्रतिबंध करण्यामध्ये केंद्रासह मणिपूर सरकारला आलेल्या अपयशाबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. याची जबाबदारी स्वीकारून मणिपूर सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली.

तसेच महाराष्ट्रात संभाजी भिडे यांच्यासारखा माणूस महात्मा गांधींबद्दल अनुदगार काढत असताना त्यांच्यावर कारवाई न करता महाराष्ट्र सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याच्या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. तसेच भिडेंना तातडीने अटक करावी, राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा त्वरित घेण्याची मागणी करण्यात आली.

Koregaon Andolan
Supreme Court On Manipur Violence: मणिपूर हिंसाचाराच्या घटनेवरून सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; तीन माजी न्यायाधीशांची समिती नेमली

या आशयाचे निवेदन तहसीलदार संगमेश कोडे यांना देण्यात आले. धरणे आंदोलनात काँग्रेसचे ॲड. विजयराव कणसे, राजेंद्र शेलार, ॲड.श्रीकांत चव्हाण, मनोहर बर्गे, आनंदराव जाधव, रिपब्लिकन सेनेचे चंद्रकांत खंडाईत, विक्रम फडतरे, सतीशराव माने, विजयराव मोरे, संभाजी ब्रिगेडचे आनंदराव बर्गे, अधिक बर्गे, तसेच संजय करपे, जोतीराम वाघ, निसार खान, रणजित फाळके, माणिक हजारे, मृणाल लवळे, अर्जुन भोसले आदी विविध पुरोगामी पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com