श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) - श्रीरामपूर येथे नानासाहेब शिंदे मित्र मंडळ व मैत्री ग्रुप दत्तनगर यांच्यातर्फे 21 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा झाला. या सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. या प्रसंगी साम मराठीचे प्रतिनिधी गोविंद साळुंके यांच्याशी संवाद साधताना राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी वीज बिल थकबाकीच्या प्रश्नावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. ( Radhakrishna Vikhe on the electricity bill arrears of the leaders of Mahavikas Aghadi, said ... )
महावितरणने थकीत वीज बिल वसुलीसाठी सक्तीची मोहीम सुरू केली होती. यात वीज बिल थकबाकीदारांची वीज जोडणी तोडण्यात आली. मात्र महाविकास आघाडीतील काही नेत्यांच्या अस्थापनांची वीज बील थकबाकी असूनही कारवाई होत नसल्याची बातमी साम मराठी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली होती. यावर आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्य सरकारचे वीज बिल थकबाकी वसुलीसाठी वीज जोडणी तोडण्याचे धोरण आहे. यात सर्वाधिक प्रभावित झालेला वर्ग शेतकरी आहे. ग्रामीण भागात धूळदान झाली आहे.
ते पुढे म्हणाले की, महावितरण कंपनीकडून योग्य नियोजन नसल्याचा हा परिणाम आहे. प्रसारमाध्यमांत पाहतो आहे की, राज्यातील मंत्र्यांचे व नेत्यांची वीज बिले थकीत आहेत. जो नियम सामान्य ग्राहकाला दिला आहे. तोच नियम मोठ्या राजकीय व्यक्तींनाही लागू केला पाहिजे, असा टोलाही आमदार विखे पाटील यांनी लगावला.
जनता मुख्यमंत्र्यांच्या शोधात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मास्क काढणार आहेत. यावर आमदार विखे पाटलांनी सांगितले की, मला आनंद आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मास्क काढण्याचा निर्णय घेतला आहे. कारण मागील दोन वर्षांपासून राज्यातील जनता मुख्यमंत्र्यांच्या शोधात होती. त्यामुळे त्यांनी मास्क काढल्यावर ते कुणाचा मास्क काढतील याची आम्हाला चिंता नाही. मात्र त्यांनी स्वतः मास्क काढलेल्याचा आम्हाला विशेष आनंद आहे, अशी कोपरखळीही त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना मारली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.