राधाकृष्ण विखे पाटलांनी आदिक, कानडेंवर डागली टीकेची तोफ

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी अनुराधा आदिक व लहू कानडे यांच्यावर टीका केली.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

महेश माळवे

Radhakrishna Vikhe Patil : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्यासमोर तालुक्यातील विविध खात्यांचा आढावा सुरू असताना पालिका कार्यकक्षेत्रातील घरकुलांच्या समोर आलेल्या आकडेवारीवरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी पालिकेच्या मागील पाच वर्षांतील कारभारावर बोट ठेवत माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक व आमदार सांगतात त्यांनाच लाभार्थी धरले जाते, असा आक्षेप नोंदवत आमदार लहू कानडे यांना अप्रत्यक्ष लक्ष्य केले.

येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरावडा योजनेंतर्गत आयोजित समाधान योजना शिबिराप्रसंगी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी श्रीरामपूरची सर्वच आघाड्यावर होत असलेल्या पीछेहाटी बाबत चांगला समाचार घेतला. यावेळी अन्नप्रक्रिया उद्योग व जलशक्ती केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल, माजी आमदार चंद्रशेखर कदम, आमदार डॉ.राहुल आहेर, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशिष येरेकर, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, नितीन किनकर, राजेंद्र गोंदकर, शरद नवले, प्रकाश चित्ते, उपस्थित होते.

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : मागील अडीच वर्षात राज्याचा विकास 25 वर्षांनी मागे गेला

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरात 3900 घरकुले मंजूर असताना 2600 लाभार्थी जागेअभावी घरकुलाच्या लाभापासून वंचित असल्याचे आकडेवारीवरून समोर आल्यानंतर विखे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. तुम्हाला जागा नसतील तर तसा प्रस्ताव पाठवा शहराजवळ शेती महामंडळाची जागा उपलब्ध आहे पाहिजे तितकी जागा मंजूर करून देतो, मात्र घरकुलाच्या लाभापासून कोणाला वंचित ठेऊ नका, असे सांगत त्यांनी श्रीरामपूर शहर झोपडपट्टीमुक्त होण्याऐवजी झोपड्यांची संख्या वाढत आहे. गेल्या पाच वर्षातील पालिकेचा कारभार पाहता शहराची पीछेहाट झाली आहे. याचे अनाधिकृत बांधकाम पाड, त्याच्यावर कारवाई करायला लावून आपल्या बगलबच्च्यांना संरक्षण दिले गेले. हे किती दिवस चालणार, अशा शब्दात माजी नगराध्यक्षा आदिक यांच्या अप्रत्यक्षपणे विखे यांनी टीकास्त्र सोडले.

आमदार सांगतात त्यांनाच लाभार्थी धरले जाते. चिठ्ठ्या-चपाट्यावर लाभार्थी निवडले जतात ते बंद करा, असा शब्दात आमदार कानडे यांचा नामोल्लेख टाळत समाचार घेत सरकार बदलले आहे, सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करा. तुम्हाला पूर्ण संरक्षण देतो, मग कोणी कितीही तक्रार करू द्या, अशी पाठराखण करतानाच देना बँक बंद झाली आहे, लोकांचे कामे करा असे अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितले.

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : जमीन वाटपात गैरव्यवहार करणाऱ्यांना सोडणार नाही

निष्क्रिय असणाऱ्यांना संधी नाही

कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर घुटमळणाऱ्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वार्डात काम करा, नाहीतर शहरातही विचार होणार नाही. तसेच जे पदाधिकारी निष्क्रिय असतील त्यांना यापुढे संधी मिळणार नाही, असा सज्जड दमही विखे यांनी भरत आगामी निवडणुकीत काय रणनीती असेल याची पुसटशी कल्पना यावेळी उपस्थितांना दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com