राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडीकडे बाबासाहेबांच्या स्मारकाला निधी नाही

आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय काढत महाविकास आघाडीवर टीकेची तोफ डागली.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - लोणी खुर्द (ता. राहाता ) येथील समता तरुण मंडळाच्‍या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. या प्रसंगी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय काढत महाविकास आघाडीवर टीकेची तोफ डागली. ( Radhakrishna Vikhe Patil said, Mahavikas Aghadi does not have funds for Babasaheb's memorial )

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, इंदूमिल येथे उभारण्यात येणाऱ्या भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्‍मारकाचे काम निधी अभावी रखडले आहे. त्यांचे नाव घेवून सत्‍ता भोगणाऱ्या महाविकास आघाडी सरकारकडे मंत्र्याच्या बंगल्‍यांसाठी पैसे आहेत, मात्र स्मारकाच्या कामाला निधी नाही, अशी खंत राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केली.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आदिवासींच्या जमीन खरेदीमध्ये मोठा गोंधळ...

ते पुढे म्हणाले की, इंदूमिल येथे उभारण्यात येत असलेल्या स्मारकाच्या रखडलेल्या कामाचा उल्लेख करून आघाडी सरकारवर निशाणा साधतानाच, लंडन येथील त्यांच्या निवासस्थानाला आंतरराष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याचे काम भाजप सरकारने केल्याचे आवर्जुन सांगितले. तसेच इंदुमिल येथील स्मारकाच्या कामाला गती देवून निधीची उपलब्‍धता करुण देण्याची मागणी त्‍यांनी केली.

डॉ आंबेडकर हे केवळ क्रांतीचा भाग नव्हते तर ते क्रांतीचे जनक होते असा गौरवपूर्ण उल्लेख करून विखे पाटील म्हणाले की, हतबल निराश आणि गलितगात्र झालेल्या समाज मनामध्ये क्रांतीची ज्योत पेटविण्याचे महत्‍वपूर्ण काम त्यांनी केले. त्‍यामुळेच समाज परिवर्तन होण्यास मोठी मदत झाली. बाबसाहेब केवळ एका समाजाचे नेते नव्हते तर, सर्वच समाज घटकांना त्यांचे न्याय हक्क मिळवेत म्हणून संविधानाच्या माध्यमातून त्‍यांनी केलेले काम या लोकशाही प्रधान देशाला पुढे घेवून जाण्यास उपयुक्‍त ठरले. त्‍यामुळेच विश्‍वनेते म्‍हणून त्‍यांचा होत असलेला गौरव आपल्‍या सर्वांसाठी अभिमानाचा असल्‍याचे त्‍यांनी नमुद केले.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, देशद्रोही मंत्र्यांची पाठराखण करण्‍यासाठी मंत्रीच रस्‍त्‍यावर...

ज्येष्‍ठ कार्यकर्ते वाय.बी ब्राम्‍हणे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या कार्यक्रमास माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, सरपंच कल्‍पना मैड, उपसरपंच गणेश विखे, लक्ष्‍मण बनसोडे, अनिल विखे, भाऊसाहेब विखे, भाऊसाहेब धावणे, नितीन ब्राम्‍हणे, सागर ब्राम्‍हणे, संजय साबळे, सरोज साबळे, अण्‍णा ब्राम्‍हणे, सिध्‍दार्थ साबळे, अनिल ब्राम्‍हणे, सोमनाथ ब्राम्‍हणे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com