Radhakrushn Vikhe Patil : कुणाला डोळ्यासमोर ठेवून निर्णय नाही, 'कात्रज दूध'बाबत विखे पाटलांचे स्पष्टीकरण!

Katraj Dairy News: चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली
Radhakrushn Vikhe Patil :
Radhakrushn Vikhe Patil : Sarkarnama
Published on
Updated on

Radhakrushn Vikhe Patil : राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या पुणे दूध उत्पादक संघ अर्थात कात्रज डेअरीतील म्हशींच्या दुधाची फॅट वाढ करण्याच्या गैरव्यवहारात संचालकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यात या प्रकरणी पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. राज्याचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत काही निर्णय घेतले आहे.

Radhakrushn Vikhe Patil :
Katraj Milk Scam: 'कात्रज दूध' गैरव्यवहाराची विखे-पाटलांकडून दखल ; दिला 'हा' आदेश

कात्रज दूधसंघाबाबत आपल्याला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार यावर कार्यवाही करण्यात आहे. कोणालाही डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतलेला नाही. यावर चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये जे काही तक्रारी करण्यात आले आहेत, जे काही आरोप आहेत, त्यावर समिती काम करेल. एका महिन्यात समितीला याबाबतचे अहवाल सादर करायला सांगितले आहे, असे विखे पाटील म्हणाले.

Radhakrushn Vikhe Patil :
Sushma Andhare : वारकऱ्यांनंतर महानुभाव पंथ सुषमा अंधारेंविरोधात आक्रमक

यावेळी विखे पाटील म्हणाले, लंपी साथीचा आजार कमी होत चालला आहे. या व्हायरसमध्ये काहीसा बदल झाल्याची माहिती मिळते. लहान वासरांमध्ये हा आजार दिसू लागला आहे. याबाबत शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम सुरू आहे. उपाययोजनांची राज्यस्तरावर सुरू असल्याचे, त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com