Katraj Milk Scam: 'कात्रज दूध' गैरव्यवहाराची विखे-पाटलांकडून दखल ; दिला 'हा' आदेश

Radhakrishna Vikhe Patil : . दूध संघाचे कागदपत्रे ताब्यात घेऊन नवीन व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्ती करावी, अशी मागणी खांडरे यांनी केली आहे.
Katraj Milk
Katraj Milk sarkarnama
Published on
Updated on

Radhakrishna Vikhe Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ता असलेल्या पुणे दूध उत्पादक संघ अर्थात कात्रज डेअरीतील म्हशींच्या दुधाची फॅट वाढ करण्याच्या गैरव्यवहारात संचालकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यात या प्रकरणी पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. आता हे प्रकरण दुग्ध विकास मंत्र्यांकडे गेले आहे. याची दखल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असा आदेश पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटलांनी दिला आहे. याबाबत भाजपचे जिल्हा सरचिटणीस अँड. धर्मंद्र खांडरे यांनी राधाकृष्ण पाटलांकडे तक्रार केली होती. गंगाराम जगदाळे, शेखर शेटे, वरुण भुजबळ, प्रदिप पिंगट यांनीही याबाबत तक्रार केली होती. याप्रकरणी पाच सदस्यीय शासकीय अधिकार्‍यांची चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी खांडरे यांनी केली होती. याबाबत त्यांनी विखे-पाटलांना पत्र पाठवले होते. या पत्राची दखल विखे-पाटलांनी घेतली आहे. दूध संघाचे कागदपत्रे ताब्यात घेऊन नवीन व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्ती करावी, अशी मागणी खांडरे यांनी केली आहे.

Katraj Milk
NCP Latest News: शरद पवारांच्या समोरचं अजितदादांनी काढली बड्या नेत्यांची खरडपट्टी ; म्हणाले..

सध्याचे संचालकमंडळ बरखास्त करावे, विद्यमान संचालकांची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी खांडरे यांनी पत्रात केली आहे. विद्यमान संचालकांनी मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार केल्याचा आरोप खांडरे यांनी केला आहे. दूध संघाच्या संचालकांची चौकशी करुन त्यांचा अहवाल एक महिन्यात द्यावा, असे पत्र राज्य सरकारने दूध संघाला पाठवले आहे.

कात्रज दूध संघाच्या जिल्ह्यातील दूध शीतकरण केंद्रातील कमी फॅट असलेले म्हैस दूध मुख्यालयात आल्यानंतर जादा फॅट लावण्याबाबतचे प्रकरण काही दिवसापूर्वी चव्हाट्यावर आले होते.

दूध भेसळीचे मशीनच तीन महिने बंद ठेवण्यात आले होते. त्यातून संचालक मंडळामधील मतभेद चव्हाट्यावर आल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संचालकांची तातडीचे बैठक घेत संचालकांना धारेवर धरले होते. शेतकर्‍यांची संस्था असल्याने नीट कारभार करण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या. त्यानंतर संचालक मंडळाने काही कर्मचार्‍यांचे निलंबन करुन काहींच्या बदल्याही केल्या होत्या. या दरम्यान सरकारकडे झालेल्या तक्रारींचे दखल घेत चौकशीच होणार असल्याने संबधितांचे धाबे दणाणले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com