Radhakrushna Vikhe News : राऊतांपाठोपाठ अंबादास दानवेंच्या डोक्यावर परिणाम; राधाकृष्ण विखेंनी डिवचलं!

Ahmednagar Politics : "उद्धव ठाकरेंनी दुसऱ्यांना गद्दार म्हणण्यापूर्वी स्वतःला आरशात पाहावे, म्हणजे गद्दार कोण हे त्यांच्या लक्षात येईल.."
Ahmednagar Politics :
Ahmednagar Politics :Sarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी ठाकरे सेनेच्या लोकांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, अशी बोचरी टीका करत प्रत्युत्तर दिले आहे. (Latest Marathi News)

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी नुकतीच महसूल, वन, राज्य उत्पादन अशा महत्वाच्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मोठ्या संख्येने झालेल्या बदल्यांवर आणि बदली प्रक्रियेवर संशय व्यक्त करत, या बदल्यात काही गैरव्यवहार झालाय का? असा प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती.

अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे शासकीय आदेश हे सरकारच्या वेबसाईटवर न देता वैयक्तिक व्हाट्सएपच्या नंबरवर अधिकाऱ्यांना देण्यात आल्या बद्दल विरोधीपक्ष नेते दानवे यांनी आश्चर्य व्यक्त करत संशय व्यक्त केला होता.

Ahmednagar Politics :
Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारावरून महायुतीत घमासान; 'प्रत्येकाची वेळ येते,' मित्रपक्षांचा निर्वाणीचा इशारा...

महसूल विभागात साठ पेक्षा अधिकाऱ्यांच्या याच पद्धतीने बदल्या झाल्या असल्याचे सांगत दानवे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर संशयाची सुई फिरविली होती. यावर आता महसूलमंत्री विखे यांनी तिखट प्रतिक्रिया देत, आधी संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला होता. आता आंबादास दानवेंच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोयस, असं उत्तर विखे म्हणाले.

सरकारने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पहाटे 4 वाजता काढून अधिकृतरित्या प्रसिद्ध न करता अधिकाऱ्यांना व्हाट्सअपवर का दिले, असा सवाल अंबादास दानवे यांनी सरकारला विचारला होता, त्यावर राधाकृष्ण विखे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मागील आठवड्यातच शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी विखेंच्या पद्मश्री विखे साखर कारखाना आणि इतर संस्थांमध्ये वादग्रस्त झाकीर नाईक याच्या संस्थेकडून मोठा निधी दिल्याचा गंभीर आरोप करत, आपण लवकरच याबाबतच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनीही महसूल विभागातील बदल्यांच्या निमित्ताने विखेंवर निशाणा साधला होता. आता विखेंनीही अगदी तिखट शब्दात संजय राऊत यांच्यानंतर रावसाहेब दानवे यांच्या डोक्यावर काही परिणाम झाला असावा, अशी टीका केली आहे.

Ahmednagar Politics :
Udayanraje Bhosale News: बाजार समितीच्या नवीन इमारतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम उदयनराजेंनी उधळला

शिवसेना ठाकरे गटाने कालच (20 जून) राज्यभर शिंदे गटाच्या विरोधात गद्दार दिन साजरा केला. यावर बोलताना विखेंनी खरे गद्दार कोण हे जनतेला माहीत आहे. ज्यांनी भाजप सोबत युती करून पन्नासवर आमदार निवडून आले, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली आणि दुरान्वयेही संबंध नसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत मुख्यमंत्री पदासाठी गेले. उद्धव ठाकरेंनी दुसऱ्यांना गद्दार म्हणण्यापूर्वी एकदा स्वतःला आरशात पाहावे, म्हणजे खरे गद्दार कोण? हे त्यांच्या लक्षात येईल असा निशाणा राधाकृष्ण विखे पाटील यांनी साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com