Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारावरून महायुतीत घमासान; 'प्रत्येकाची वेळ येते,' मित्रपक्षांचा निर्वाणीचा इशारा...

Cabinet Expansion Of Shinde Fadnavis Government : मंत्रिमंडळ विस्तारावरून कडू-खोतांचा निर्वाणीचा इशारा..
Cabinet Expansion News :
Cabinet Expansion News :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत घडवलेल्या बंडाला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन होऊन अकरा महिने होत आहेत, मात्र अजूनही या सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होऊ शकला नाही. यामुळे मंत्रिपदाची आस लावून बसलेले आमदारांसोबतच युतीचे मित्रपक्ष नाराज झाला आहे.

Cabinet Expansion News :
ED Action On Anil Ramod: सीबीआयनंतर आता अनिल रामोडावर 'ईडी'ची वक्रदृष्टी?

सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार करण्याची क्षमता आहे की नाही? असा आसूड ओढत सरकार समर्थक आमदार व प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनीच सरकारला घरचा आहेर दिला होता. यानंतर युतीतील मित्र व रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनीही मंत्रिमंडळ विस्ताराच्या विलंबावर बोट ठेवत, नाराजी व्यक्त केली आहे.

“भारतीय जनता पक्षाला मित्रपक्षांची अजूनही आठवण झालेली दिसत नाही. असू द्या, प्रत्येकाची वेळ येते असते. आम्ही आमची वाट पाहतोय,” असं सूचकपणे सदाभाऊ खोत यांनी म्हंटले आहे. ते जालन्यामध्ये माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते.

नेमंक काय म्हणाले सदाभाऊ ?

“युतीमध्ये आणि या सरकारसोबत राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसंग्राम संघटना आणि रयत क्रांती संघटना असे चार घटकपक्ष आहेत, त्यांचे मित्र पक्ष आहेत. आमचं सरकार आलं आहे. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मित्रपक्षांची आठवण झालेली दिसत नाही. बैठक बोलावायची पाहिली की आमचा नंबर अजूनही आलेला नाही, हे आमहाला समजलं नाही, असाही टोला सदाभाऊ खोत लगावला आहे.

Cabinet Expansion News :
Thackeray v/s Shinde;४ शक्यता आणि मोठे परिणाम । Uddhav Thackeray । Eknath Shinde । Supreme Court

"मंत्रिमंडळ विस्तार २०२४ नंतरच" -

रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून बच्चू कडू यांनीही सातत्याने नाराजी व्यक्त केली आहे. बच्चू कडू माध्यमांशी बोलताना म्हणाले, “मंत्रिमंडळ विस्तार होण्यासाठी एक वर्ष लागणार, असं आपल्याला वाटलं नाही. पण एक वर्षाच्या कालावधीनंतरही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. हे दुर्देवी आहे. आता असं वाटतंय की २०२४ नंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. आताच्या सरकारमध्ये ती क्षमता नाही.”

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com