रघुनाथ पाटील म्हणाले, आता संघर्षाची वेळ आली आहे...

राज्यात उसाचे पीक मुबलक आहे. मात्र साखर कारखान्यांकडून वेळेवर ऊस तोड होत नाही.
Raghunath Patil
Raghunath Patilsarkarnama
Published on
Updated on

महेश माळवे

श्रीरामपूर (जि. अहमदनगर ) - राज्यात उसाचे पीक मुबलक आहे. मात्र साखर कारखान्यांकडून वेळेवर ऊस तोड होत नाही. तसेच जगात भारताच्या साखरेला मोठी मागणी असूनही साखर कारखाने उसाला भाव देत नसल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकरी संघटनेने काल ( शनिवारी ) श्रीरामपूरमध्ये ऊस परिषद घेतली. या परिषदेत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी शेतकऱ्यांना दूरदृश्‍यप्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना राज्य सरकार व साखर कारखान्यांना आंदोलनाचा इशारा दिला आहे. ( Raghunathdada Patil said, now is the time for struggle ... )

ऊस परिषदेला स्वतंत्र भारत पक्षाचे नेते अनिल घनवट, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नांदखिले, धनंजय काकडे, रूपेंद्र काळे, ॲड. अजित काळे, अनिल औताडे, प्रहारचे अभिजित पोटे, ॲड. सर्जेराव कापसे, विष्णुपंत खंडागळे, युवराज जगताप, नारायण टेकाळे आदी उपस्थित होते.

Raghunath Patil
सरकारी कर्मचाऱ्यांना महिना पाचशे रूपयेच पगार द्या : रघुनाथ पाटील 

रघुनाथ पाटील म्हणाले, शेतकरी आत्महत्या थांबल्या आहेत, कर्जाचा प्रश्न संपला आहे, शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न संपले असून, केवळ भावाचा काय तो प्रश्न उरला असल्याच्या अविर्भावात सर्वच राजकीय पक्ष वावरत आहेत. मात्र शेतकरी हिताच्या आम्ही करत असलेल्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत. आता संघर्षाची वेळ आली आहे. जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यात उद्रेक होईल, असा इशारा रघुनाथ पाटील यांनी दिला.

पाटील पुढे म्हणाले की, शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या खुल्या धोरणाचा स्वीकार करून जे जे शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली येतील, त्या सर्वांचे स्वागत आहे. संघटना शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असेही ते त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com