Raghunath Patil News: हातकणंगले मतदारसंघात रघुनाथदादांची एन्ट्री, लोकसभा लढवण्याची केली घोषणा

Hatkanangale Lok Sabha Election 2024: रघुनाथदादा पाटील यांनी कोल्हापूर, हातकणंगलेसह नऊ जागांवर भारतीय जवान किसान पार्टी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत केली.
Raghunathdada Patil
Raghunathdada PatilSarkarnama

Hatkanangale Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत. तसे अनेक इच्छुक निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. अशातच आता शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत.

मागील वर्षभर भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षात काम केल्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी भारतीय जवान किसान पार्टीतर्फे लोकसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर केलं आहे.

रघुनाथदादा पाटील (Raghunath Patil) यांनी कोल्हापूर, हातकणंगलेसह (Hatkanangale) नऊ जागांवर भारतीय जवान किसान पार्टी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत केली. यावेळी ते स्वत: हातकणंगलेची जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता हातकणंगले मतदारसंघात नवीन ट्विस्ट आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हातकणंगले मतदारसंघात 5 उमेदवारांमध्ये लढत

हातकणंगले मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे धैर्यशील माने (Dhairshil mane), महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetty) तर वंचितकडून दादागौडा पाटील मैदानात आहेत. अशातच आता रघुनाथदादा पाटील यांनीदेखील निवडणूक लढवण्याचं जाहीर केल्यामुळे या मतदारसंघात एकूण 5 उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Raghunathdada Patil
Kolhapur Loksabha News : शिवसेनेचा वाघ कोल्हापुरात शांत; सांगलीत काँग्रेसची डरकाळी

भाजप 200 पार करणार नाही

कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत बोलताना पाटील यांनी भारतीय जनता पक्षासह (BJP) त्यांचे जुने सहकारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार राजू शेट्टी यांच्यावर निशाणा साधला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 200 जागा पार करता येणार नाहीत. कारण सामान्य जनता भाजपच्या कारभारावर नाराज असल्याचं पाटील म्हणाले. तर स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी मागील हंगामात ऊस दरासाठी केलेलं आंदोलन निरर्थक असल्याचं म्हणत त्यांनी शेट्टींवर हल्लाबोल केला. तर भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात निवडणूक लढवण्यास नकार दिला असल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com