Kolhapur News, 07 Sep : काँग्रेस राज्य आणि केंद्रात सत्तेत नसले तरी पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस झपाट्याने वाढत आहे. त्यामागे पश्चिम महाराष्ट्रातील युथ फळी काँग्रेसला नवा चेहरा देण्याचा प्रयत्न करत आहे. सांगलीतून विशाल पाटील, माजी मंत्री विश्वजीत कदम आणि कोल्हापुरातून काँग्रेसचे (Congress) नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी आपापल्या जिल्ह्यात काँग्रेस वाढीसाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.
त्याची भुरळ खुद्द काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पडल्याचे दिसून येते. कारण नुकताच सांगली येथे झालेल्या स्वर्गीय पतंगराव कदम यांचा पुतळा अनावरण सोहळ्यात विशेषत या तिघांची ही नावे राहुल गांधी यांनी भाषणात घेतली. मात्र महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे स्टेजवर उपस्थित असून देखील त्यांचं नाव टाळले.
त्यांनी जाणून-बुजून टाळले की त्यांना नाव देण्यात आले नाही. याबाबत कल्पना नाही. मात्र, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील युवा फळी राहुल गांधी यांच्या पटलावर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व आमदार सतेज पाटील यांच्याकडे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मोदी आणि महायुतीची सत्ता असताना मागील विधानसभा निवडणुकीत चार आमदार, आणि दोन विधान परिषदेचे आमदार निवडून आले आहेत.
तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरची (Kolhapur) जागा काँग्रेसकडे घेऊन शाहू महाराज छत्रपती यांना खासदार करण्यासाठी त्यांचे कष्ट राहिले आहेत. इतकेच नव्हे तर सांगली लोकसभा मतदारसंघात ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या मागे रसद पुरवून त्यांना विजयी करण्यापर्यंत सतेज पाटील कुठेही कमी पडले नाहीत. असे सांगितले जाते. शिवाय सांगलीचे नेते विश्वजीत कदम यांनी देखील सतेज पाटील यांची भूमिका नुकतीच स्पष्ट केली.
सांगली (Sangli) जिल्ह्यातून काँग्रेसचे नेते असलेले विशाल पाटील आणि लोकसभा निवडणुकीत अपक्ष मैदानात उतरून विजय मिळवला. विश्वजीत कदम यांची पडद्यामागून मदत मिळाली हे लपून राहिलेले नाही. सुरुवातीपासूनच विश्वजीत कदम यांनी पाटील यांच्या उमेदवारीसाठी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत नेत्यांचे उंबरे झीजवले होते. विशाल पाटील हे निवडून आल्यानंतर काँग्रेसमध्ये आले.
मात्र, सध्या काँग्रेसचे नेतृत्व विश्वजीत कदम यांच्याकडेच आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील खास करून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील हे दोन नेतृत्व राहुल गांधी यांना मानणारे आहे. त्यामुळे भविष्यातील काँग्रेस पाहण्यासाठी राहुल गांधी ही सज्ज असल्याने काँग्रेसमधील युवा नेत्यांच्यावर जबाबदारी टाकण्याची संकेत चांगली दौऱ्याच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी दिले.
कारण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे या कार्यक्रमाला उपस्थित असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव टाळले. त्याला जी -23 प्रकरण कारणीभूत आहे का अशी चर्चा देखील उपस्थित स्थळी होती.
2019 मधील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे असताना राहुल गांधी पक्षाचे निर्णय होते. त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला अंतर्गत विरोध होऊ लागला. हे काँग्रेस अंतर्गत विरोध करणाऱ्या 23 जणांच्या गटाला जी-23 म्हटले जाऊ लागले. त्यानंतर काँग्रेसमध्ये गांधी निष्ठावान व बंडखोर असा वाद वाढत गेला.
यामध्ये गुलाम नबी आझाद, कपिल सिबल, शशी थरूर, मनीष तिवारी, आनंद शर्मा, पी. जे. कुरियन, रेणुका चौधरी, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, जितीन प्रसाद, भूपेंद्र सिंह हुडा, राजिंदर कौर भट्टल, एम. वीरप्पा मोईली, पृथ्वीराज चव्हाण, अजय सिंह, राज बब्बर, अरविंद सिंह लवली, कौल सिंह ठाकूर, अखिलेश प्रताप सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री, संदीप दीक्षित, विवेक तन्खा यांचा समावेश होता. हे प्रकरण 2020 मधील होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.