Rajaram Sugar Factory : 'कुस्ती मर्दासारखी लढा, रडीचा डाव खेळू नका'; सतेज पाटील - महाडिक संघर्ष पेटला!

Kolhapur News : सहकारक्षेत्रासाठी आजचा काळा दिवस
Rajaram Sugar Factory :
Rajaram Sugar Factory : Sarkarnama
Published on
Updated on

Satej Patil Vs Mahadik Group : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या गटाला मोठा धक्का बसला होता. सतेज पाटील (Satej Patil) गटातील तब्बल २९ उमेदवार अपात्र ठरले गेले आहेत. या अपात्र उमेदवारांनी ऊस कारखान्यात देताना, नियमांचं पालन केलं गेलं नाही, असा ठपका ठेवण्यात आला. यावरून आता कारखान्यातील राजकारणात आरोप प्रत्यारोप होत आहेत.

Rajaram Sugar Factory :
Nashik ZP : सुहास कांदेंसाठी धावपळ...राहुल आहेरांकडे कानाडोळा!

आपल्या गटातील उमेदवारांना अपात्र ठरवल्यानंतर सतेज पाटील यांनी माजी आमदार महादेव महाडिक गटाला आव्हान दिले आहे. सतेज पाटील या अपात्रेबाबतच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. "आजचा दिवस हा काळा दिवस आहे, न्यायालयातच आम्हाला न्याय मिळू शकतो," असे पाटील म्हणाले.

सतेज पाटील गटाचे उमेदवारांना अपात्र ठरवल्यानंतर महाडीक गटावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. पाटील म्हणाले की, "सगळा कारभार त्यांच्या हातात आहे, त्यामुळे ते काय काय गडबड करणार याचा आला मला अंदाज आलाच होता. मात्र आमचं शक्तीप्रदर्शन पाहिल्यानंतर त्यांचं डोकं चालायला लागलं. लोकांमध्ये जाऊन, निवडणुका त्यांना कधीच जिंकता येणार नाही, हे महाडिक गटाला चांगलंच कळतं, म्हणूनच त्यांनी रडीचा डाव खेळला आहे.

Rajaram Sugar Factory :
Shivadi Court Fines Sanjay Raut: खासदार संजय राऊतांना शिवडी न्यायालयाचा दणका

आजचा काळा दिवस म्हणावा लागेल :

आमच्या 28 उमेदवारांना जो काही निकष लावण्यात आला, तोच निकष सगळ्यांना का नाही लावण्यात आला? आजचा दिवस हा राज्याच्या सहकार क्षेत्रातला काळा दिवस म्हणावा लागेल, आमच्या सर्व गटात अर्ज शिल्लक आहे. महाडिक गटाचा एक सुद्धा उमेदवार बिनविरोध येत नाही, असे ही पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com