Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्ह्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखानापदी अध्यक्षपदी महाडिक गटाचे नेते व माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik President Of Rajaram Sahakari Sakhar Karkhana) यांची, तसेच उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण (Narayan Chavhan) यांची निवड करण्यात आली.
आज मंगळवार दि. ९ मे रोजी ही औपचारिक निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीनंतर संचालकांनी, यावेळी सभासदांनी व कार्यकर्त्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (Latest Marathi News)
कोल्हापूर जिल्ह्यातली श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत होती. कोल्हापूरातील माजी आमदार महादेवराव महाडिक विरुद्ध माजी गृहराज्यमंत्री व काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यात या निवडणुकीवरून घमासान झाले होते. ही निवडणुक माध्यमाच्या केंद्रस्थानी आले होते.
साखर कारखान्याच्या या निवडणुकीत महादेवराव महाडिक यांच्या गटाच्या पॅनलने, काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या पॅनलचा दारूण पराभव केला होता. यामुळे कारखान्यावर महाडिक गटाचे वर्चस्व राहिले होते. तर सतेज पाटील (Satej Patil) गटाचा पराभव झाला होता. आज साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक यांची पहिलीच सर्वसाधरण सभा बोलवण्यात आली होती.
आजच्या सभेत नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आली. नव्या संचालकांसोबत पहिल्याच बैठकीत कारखान्याचे नवे अध्यक्ष म्हणून माजी आमदार अमल महाडिक यांची एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी दिलीप उलपे यांना संधी मिळेल असे बोलले जात होते. दरम्यान, नारायण चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.