Rajendra Patil Yadravkar : सा. रे. पाटील यांच्या विचारांचा मी वारसदार; आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर

‘दिवंगत सा. रे. पाटील यांनी मला राजकीय आणि सामाजिक विचारांचा वारसदार म्हणून घोषित केले आहे.
Rajendra Patil Yadravkar : सा. रे. पाटील यांच्या विचारांचा मी वारसदार; आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर
Published on
Updated on

जयसिंगपूर : ‘दिवंगत सा. रे. पाटील यांनी मला राजकीय आणि सामाजिक विचारांचा वारसदार म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच माझी राजकीय घोडदौड सुरू आहे. तालुक्यामध्ये दोन हजार कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. तथापि, जांभळीतील मराठा मंडळाचे सभागृह राजकीय हेव्यादाव्यांमुळे रखडले आहे,’ अशी खंत राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जांभळी येथे व्यक्त केली.

यड्रावकर म्हणाले, ‘राजकारणावेळी राजकारण जरूर असावे. लोकशाहीने दिलेला तो अधिकार आहे. मात्र, विकासकामांसाठी येथील ग्रामपंचायत ठराव देत असताना काम होऊच नये अशा आशयाचा ठराव देतात, अशा राजकारणाला काय म्हणायचे? मी या गावचा रहिवासी नाही, अशी ओरड सुरू आहे. जांभळी व यड्रावचे ऋणानुबंध अतूट आहेत. येथे दिवंगत शामराव पाटील यांचे विशेष लक्ष होते. जांभळीत दादागिरी आणि दहशत आहे. यापुढे तुमच्या केसाला धक्का लागला तर तुमच्या पाठीशी खंबीर राहीन. यापुढेही विकासनिधी मोठ्या प्रमाणात घेऊन जांभळीचा चेहरामोहरा बदलणार आहे.’

कुलदीप पाटील म्हणाले, ‘जांभळीत आमदार राजेंद्र पाटील यांच्या विरोधात सूडाचे आणि द्वेषाचे राजकारण सुरू आहे. गेली पाच वर्षे मराठा मंडळाच्या सभागृहाचे काम रखडले आहे. केवळ याचे श्रेय यड्रावकर यांना जाते म्हणून की काय ?’

यावेळी बाबगोंडा पाटील, चंद्रकांत मोरे, प्रकाश पाटील-टाकवडेकर, अभिजित जगदाळे, पोपट पुजारी, मुकुंद गावडे, कुलदीप पाटील, यड्रावचे सरपंच कुणालसिंह निंबाळकर, प्रमोद पाटील, प्रशांत कांबळे, पिंटू पाटील, संतोष उगले, उमेश करडे, बापू गोविलकर, नेताजी चव्हाण, सोमनाथ कुंभार, प्रल्हाद पवार, तायाप्पा कांबळे, सुनील मोरे, संदीप चव्हाण, विकास शिंदे, नसरुद्दीन आत्तार, सुखदेव गायकवाड यांच्यासह सर्व नंदीवाले समाज उपस्थित होता. दरम्यान, बस्तवाड येथेही प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com